ISRO News | भारताचा अंतराळ उद्योग 82 लाख कोटींचा होणार

ISRO News

Image Source 

ISRO News | 20 जुलै 1969. अमेरिकेच्या नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस अडमिनिस्ट्रेशन (NASA) या संस्थेने पाठवलेला अंतराळवीर निल आर्मस्ट्राँग याच दिवशी चंद्रावर उतरला होता. या निमित्ताने मानवी इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या माणसाने चंद्रावर पाऊल ठेवलं.

निल आर्मस्ट्राँगने चंद्रावर ठेवलेल्या पहिल्या पावलाचं वर्णनही अगदी योग्य प्रकारे केलेलं आहे.

निल आर्मस्ट्राँग त्यावेळी म्हणाला होता, “चंद्रावर मानवाने ठेवलेलं हे छोटंसं पाऊल आहे. पण संपूर्ण मानवजातीसाठी ही खूप मोठी झेप आहे.”

त्याच्यानंतर जवळपास 50 वर्षांनंतर भारताच्या राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) पाठवलेलं चंद्रयान-3 बुधवारी (23 ऑगस्ट) चंद्रावर उतरलं. चंद्रावरील दक्षिम ध्रुवावर पहिल्यांदाच एखादं यान उतरण्याची कामगिरी या मोहिमेत करण्यात आली आहे.

चंद्रयानाच्या मदतीने चंद्रावर पाठवलेलं विक्रम लँडर पृष्ठभागावर उतरल्यानंतर काही वेळाने प्रज्ञान रोव्हर त्यामधून बाहेर पडलं. सद्य स्थितीत प्रज्ञान हे चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून तेथील विविध माहिती पृथ्वीवर पाठवत आहे.

प्रज्ञान रोव्हरचा वेग केवळ एक सेंटीमीटर प्रतिसेकंद इतकाच आहे. पण शास्त्रज्ञांच्या मते, भारताच्या या यशाने जगभरातील अंतराळ क्षेत्रात अनेक मोठे बदल अत्यंत वेगाने घडताना दिसतील.

इंटरनॅशनल करंट अफेअर्स फॉरेन पॉलिसीने याविषयी बोलताना म्हटलं, “भारताच्या चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगमुळे जागतिक राजकारणात मोठा परिणाम होणार आहे.”

ISRO News | एक लाख कोटी डॉलर्सचा अंतराळ उद्योग

आगामी काळात भारताच्या अंतराळ उद्योगाचं बजेट एक लाख कोटी डॉलरपर्यंत (82 लाख कोटी रुपये) पोहोचू शकतो, अशी शक्यता भारताचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी वर्तवली आहे.

चंद्रयान-3 च्या यशानंतर हे लक्ष्य गाठणं भारतासाठी फारसं अवघड नसेल. या यशामुळे भविष्यात भारताचा युवा वर्ग अंतराळ क्षेत्राकडे नक्कीच आकर्षित होणार आहे, अशा स्थितीत अंतराळ क्षेत्रातील संधी आपल्यासाठी खुल्या झाल्या आहेत.

तक्षशिला इन्स्टिट्यूट येथे अंतराळ आणि जागतिक राजकारण या विषयाचं शिक्षण घेत असलेल्या आदित्य रामनाथन यांच्या मते, तरुण वर्ग भविष्यात मोठ्या प्रमाणावर अंतराळाशी संबंधित मोहिमांमध्ये सहभागी होताना दिसतील. चंद्रावर मोठ्या प्रमाणात खनिजे आणि इंधन साठा असण्याची अंदाज वर्तवण्यात येत असतो. त्यामुळेच अनेक देशांना चंद्राने नेहमीच आकर्षित केलेलं आहे. इस्रोच्या चंद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे भारताने या मोहिमांमध्ये आघाडी घेतल्याचं म्हणता येईल.

ISRO News चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची स्पर्धा

चंद्रावर पोहोचण्याच्या संदर्भात रशिया आणि अमेरिका या दोन देशांमध्ये साठ वर्षांपासून स्पर्धा आहे. तर आता या स्पर्धेत आणखी एक देश उतरलेला आहे.

सध्या सर्वच देशांची नजर ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे आहे. या भागात पाणी आढळून येण्याच्या शक्यतेमुळे शास्त्रज्ञांना या विषयात रस आहे.

ISRO News

Image Source 

रशियाने नुकतेच चंद्रावरची आपली मोहीम 47 वर्षांनी पुन्हा सुरू केली. पण दक्षिण ध्रुवावर पोहोचण्यासाठीची त्यांची Luna-25 ही मोहीम 20 ऑगस्ट रोजी अयशस्वी ठरली. ISRO News

यानंतर तीनच दिवसांत भारताच्या चंद्रयान-3 ला मात्र दक्षिण ध्रुवावरच्या मोहिमेत यश मिळालं. या व्यतिरिक्त रशियाची चंद्रावर 2025 साली अंतराळवीर पाठवण्यासाठीही एक मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे. याशिवाय, 2030 पर्यंत चीनचंही अशा प्रकारच्या मोहिमां सुरू करण्याचं नियोजन आहे.

याव्यतिरिक्त इस्रायल, जपान, संयुक्त अरब अमिरात यांच्यासारख्या देशांनाही चंद्रावर जायचं आहे. पण त्यासाठीचे त्यांचे प्रयत्न आजवर यशस्वी ठरलेले नाहीत.

चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर पाण्याची उपलब्धता आहे का, याकडे सर्वांची नजर आहे. कारण त्याचा वापर रॉकेटमध्ये इंधन म्हणून करता येऊ शकतो.

ISRO News | अंतराळ क्षेत्रात भारत करणार नेतृत्व

विल्सन सेंटर येथील साऊथ एशिया सेंटरमध्ये संचालकपदावर कार्यरत असलेल्या माईक कुगलमन यांच्या मते, “भारताच्या चंद्रयान-3 मोहिमेला यश मिळणं हे केवळ भारताचंच यश नाही, तर संपूर्ण जगाचं यश आहे.”

भारताच्या आधीच्या अंतराळ मोहिमांबाबत बोलताना ते म्हणतात, “पूर्वी पाठवलेले उपग्रह जमिनीतील पाण्याची पातळी, हवामानाचे अंदाज यांच्यासाठी उपयुक्त होते. हवामान बदलाचे परिणाम भोगत असलेल्या देशांच्या दृष्टिकोनातून ही माहिती खूपच महत्त्वाची आहे.”

भारताची एक थिंक टँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑबझर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. राजी राजगोपालन याबाबत बोलताना म्हणतात, “चंद्रयानाचं यश हे जगभरातील अंतराळ क्षेत्रावर परिणाम करेल. भारताचं अंतराळ तंत्रज्ञान हे अत्यंत आधुनिक आहे. भारत याबाबत खूपच पुढे आहे, तो या मोहिमांमध्ये नेतृत्व करू शकतो, हे यातून दिसलं आहे.”

डॉ. राजी राजगोपालन पुढे सांगतात, “भारताने ही मोहीम अत्यंत कमी खर्चात पूर्ण केली आहे. त्यामुळेही याला महत्त्व आहे.”

प्रिन्सवॉटर हाऊस कूपर्सने नुकतेच लुनार इकोनॉमी नामक एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानुसार चंद्रावर उपलब्ध असलेल्या संसाधनांचा चंद्र आणि पृथ्वीसाठी वापर केला जाऊ शकतो. त्याला लुनार एकोनॉमी असं संबोधलं जाऊ शकतं.

ISRO News

उदाहरणार्थ चंद्रावर हेलियम-3 मुबलक प्रमाणात आढळून येतं. नवीकरणीय ऊर्जा (रिन्यूएबल एनर्जी) संदर्भात संसाधन म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे लुनार इकोनॉमीमध्ये हेलियमला महत्त्व आहे. ISRO News

तसंच या अहवालात त्यांनी विविध देशांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेबा बतही उल्लेख केला आहे. त्यामुळे स्पर्धेत चंद्रावरील जागेवर दावा करायचा झाला तरी भारत त्यात पुढे असेल, कारण दक्षिण ध्रुवावर भारतच पहिल्यांदा पोहोचला आहे, असं तज्ञांनी म्हटलं आहे.

हेही वाचा

Isro Sun Mission | आता इस्रो करणार सूर्याचा अभ्यास

PM Modi Speech | चंद्रयान-3 उतरलेल्या जागेला ‘शिवशक्ती’ नाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *