तहसिलदार जयवंत पाटील यांना निलंबित करा

Innumerable and illegal sand extraction

समुदायाद्वारे पडताळणी केले आयकन

सोलापूर : प्रतिनिधी

उत्तर सोलापूर तालुक्यात बेसुमार व बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू आहे. या गैरप्रकाराला तहसिलदार जयवंत पाटील जबाबदार आहेत. त्यामुळे तहसिलदार जयवंत पाटील यांना निलंबीत करा, अशी मागणी छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मेलव्दारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदुर, शमशापुर, तिरे, शिवनी, पाथरी या गावात सीना नदीतुन बेकायदेशीर वाळु उपसा सुरु आहे. तहसीलदार जयवंत पाटील यांच्याकडे यासंदर्भात अनेकांनी तक्रार केल्या आहेत. परंतु तहसीलदार पाटील हे सबंधित वाळु उपसा करणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून हप्ते घेत आहेत. म्हणून ते कारवाई करत नाहीत. हा अवैध व बेकायदेशीर वाळु उपसा झाल्यामुळे सीना नदीचे पात्र पुर्णपणे रिकामी होत आहे. यामुळे शेतकरी व शासनाचे नुकसान होत आहे. शासनाचे कोट्यावधी रूपयांचा महसुल बुडत आहे. जयवंत पाटील हे शासनाचे नुकसान करुन स्वत:चे घर भरत आहेत. तरी अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांस शासनाने तात्काळ निलंबित करुन संपुर्ण कामाची चौकशी करावी, अशी मागणी छावा संघटनेने तालुका अध्यक्ष गणेश मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *