सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने इंद्रभुवन येथे महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त विद्या पोळ, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत, मुख्य लेखा परीक्षक रूपाली कोळी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहनानंतर महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची आणि पंच प्रण शपथ दिली. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही महानगरपालिकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या अधिकारी-कर्मचारी गुणवंत पुरस्कारांचे वितरण आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने मुलींसाठी राबवण्यात येणाऱ्या मोफत बस सेवा संदर्भात महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते उपस्थिती मुलींना मोफत बसचे स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले.