डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांना बडतर्फ करा- आरोग्य मंत्र्यांकडे छावा संघटनेची मागणी

Dr. Aniruddh Pimpale

सोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्याकडून संपूर्ण जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन बायोमेट्रिक उपस्थिती शिवाय अदा केले जात आहे. तसेच निलंबित डॉ. शितलकुमार जाधव यांच्यानंतर आरोग्य संस्थांचा बृहत आराखडा प्रस्ताव पाठवण्याचे काम डॉ. पिंपळे यांचे आहे. परंतु त्यांनी आरोग्य संस्था यांचा बृहत आराखडा प्रस्ताव न पाठवून सोलापूर जिल्ह्यातील जनतेला मूलभूत व हक्काच्या आरोग्य सेवेपासून वंचित ठेवले आहे, त्यामुळे डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे यांना निलंबित (Suspende) करावे आणि चौकशीअंती बडतर्फ (Dismiss) करा, अशी मागणी छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश मोरे यांनी आरोग्य मंत्री (Minister Health) तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्याकडे मेलव्दारे केली आहे. 

तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, डॉ. अनिरुद्ध नंदकूमार  पिंपळे यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य विभाग,  जिल्हा परिषद, सोलापूर येथील प्रशासकीय अधिकारी पदाचा कार्यभार आहे. सदरचे पद हे गट ब दर्जाचे आहे. वस्तूत: गट अ दर्जाच्या अधिकाऱ्यांनी निम्न स्तरावरील पद अतिरिक्त कार्यभार स्वीकारणे हे तर्क संगत नाही. तरीपण प्रशासकीय अधिकारी यांचेकडे आहरण व संवितरण याचे अधिकार असल्याने डॉ. अनिरुद्ध पिंपळे हे स्वतर: गट अ चे अधिकारी असूनही प्रशासकीय अधिकारी गट ब या पदाचा कार्यभार पाहत आहेत. या पदाचा कार्यभार पाहत असताना लाखों रुपयांचा गैर व्यवहार करीत आहेत. राज्य स्तरावरून बायोमेट्रिक उपस्थिती शिवाय वेतन अदा करू नये असे आदेश असतानाही, या आदेशकडे दुर्लक्ष करून व त्या आदेशाचा अवमान करून शिस्तभंगाचे वर्तन करून डॉ. पिंपळे हे संपूर्ण जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी यांचे वेतन बायोमेट्रिक उपस्थिती शिवाय अदा करत आहेत.

तसेच सध्या निलंबित असलेले  तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांना आरोग्य संस्था यांचा बृहत आराखडा प्रस्ताव न पाठविणे व इतर कारणासाठी निलंबित करून त्यांची चोकशी चालू करण्यात आलेली आहे. आपल्या अधिनस्त कर्मचारी यांचेकडून प्रस्ताव प्राप्त करून वेळेत शासनास सादर करणे हे प्रामुख्याने प्रशासकीय अधिकारी यांचे कर्तव्य होते. परंतु डॉ. अनिरुद्ध नंदकूमार  पिंपळे यांनी प्रशासकीय अधिकारी या पदाचा कार्यभार पाहत असताना या बाबींकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेल आहे. आरोग्य संस्थांचा बृहत आराखडा प्रस्ताव न पाठवून सोलापूर जिल्ह्यातील जनतेला मूलभूत व हक्काच्या आरोग्य सेवेपासून वंचित ठेवणे या करीता सध्या निलंबित असलेले तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्या सोबत डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे हे ही प्रशासकीय अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर या नात्याने तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे यांचे निलंबन करावे आणि चौकशीअंती बडतर्फची कारवाई करावी, अशी मागणी छावा संघटनेच्यावतीने तालुका अध्यक्ष गणेश मोरे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *