Hasan Mushrif On Jitendra Awhad : कोल्हापुरात काल (ता.25) दसरा चौकात स्वाभिमानी निष्ठावंतांची निर्धार सभा पार पाडली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अर्ध्या तासाच्या भाषणात केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युतर देत हसन मुश्रीफ म्हणाले, जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यामध्ये संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष संपवला.
कोल्हापुरातील सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रवादीतील फुटीरांवर टीकास्त्र सोडत हल्लाबोल केला. या सभेत नाव न घेता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. याचबरोबर आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. उस्तादना भेटायला वस्ताद आला आहे. आमचा वस्ताद भयंकर आहे. कुस्ती त्याच्याशी आहे म्हटल्यावर समोरच्याची घाबरगुंडी उडते. गद्दारी काही लोकांच्या रक्तात असून, अशा सापांना चेचण्यासाठी पायताणाचा वापर करावा लागेल अशी टीका जितेंद्र आव्हा़ड यांनी केली होती. याला प्रत्यूत्तर म्हणून आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूरमध्ये कापशीच चप्पल प्रसिद्ध आहे, ती कर्कर वाजते. ती जेव्हा बसेल तेव्हा कळेल, असा टोला जितेंद्र आव्हाड यांना लगावला.
यावेळी बोलताना Hasan Mushrif म्हणाले की, आम्ही अजितदादांसोबत का गेलो हे याआधी सांगितलं आहे. आमचा निर्णय पक्षाच्या विस्तारासाठी आहे. हा सामूहिक निर्णय आहे. याबाबतच्या चर्चा आमच्या दैवताबरोबर झाल्या होत्या. जितेंद्र आव्हाड यांनी पवारांवर काय जादू केली मला माहित नाही. त्यांनी ठाण्यामध्ये संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष संपवला. त्यांनी अशी भाषा बोलायला नको होती. एकनाथ शिंदे गुहाटीला गेले त्यावेळी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी पाठिंबाचे पत्र दिलं होतं. त्यावर जितेंद्र आव्हाड यांची देखील सही होती. यावेळी गृहनिर्माण खातं आव्हाड हृदयाला कवटाळून बसले. त्यावेळी कुठे गेला होता तुझा धर्म.
Hasan Mushrif
काल शरद पवार यांची सभा सोशल प्लॅटफॉर्मवरून लाईव्ह सुरु होती. ही सभा हसन मुश्रीफ यांनी लाईव्ह पाहिली याचे स्क्रिन शॉट काल व्हायरल झाले. यासंदर्भात बोलताना मुश्रीफ म्हणाले, माझ्या सोशल अकाउंटवरून ही सभा माझ्या टीमने पाहिली. मी कलेक्टर ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये होतो.
Hasan Mushrif पुढे बोलताना म्हणाले की, पवार साहेबांविषयी काहीही बोलणार नाही. सत्तेत सहभागी होण्याआधी न्यायालयाने आम्हाला दिलासा दिला आहे. त्यावेळी देखील इतरांसारखी सहानुभूती आम्हाला मिळाली नाही. टीका करणारे स्थानिक नेते अतृप्त आत्मे आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा पक्ष असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.