
उत्तर देताना Gashmeer Mahajani लिहिलं, ‘हातात मोबाइल आणि मोफत डेटा असलेली व्यक्ती त्याच्या अंधाऱ्या खोलीत बसून एखाद्या गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल काहीही मतं मांडू शकते. तेसुद्धा खरं काय घडलंय याची काहीच माहिती नसताना.’
‘तुमची आई आता ठीक असेल अशी अपेक्षा करतो’, असं एकाने म्हटलं. त्यावर गश्मीरने लिहिलं, ‘आजच आईला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ती सध्या फिट अँड फाइन आहे.’ त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी प्रश्न विचारल्यावर गश्मीरने उत्तर दिलं, ‘होय, खूप प्रोजेक्ट्स आहेत. पण गेल्या आठवड्यात आईची प्रकृती खालावल्याने तिची काळजी घेण्यात व्यग्र होतो. आता ती ठीक आहे. पुढील पंधरा दिवसांत मी कामावर परतेन.’
‘काही दिवसांपूर्वी तुझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यावर ट्रोल करणाऱ्यांना काय उत्तर देशील’, असाही सवाल गश्मीरला एका नेटकऱ्याने केला. त्यावर त्याने लिहिलं, ‘कधीकधी मला उत्तर द्यायची इच्छा होते. पण मग विचार येतो की का? ते माझं आयुष्य जगत नाही आणि जरी त्यांची इच्छा असली तरी ते माझं आयुष्य जगू शकत नाहीत. त्यामुळे शांत राहणंच योग्य आहे. त्यांच्याकडे मोकळा वेळ आहे, पण मला बऱ्याच लोकांची काळजी घ्यायची आहे आणि माझ्या हातात बरंच कामसुद्धा आहे.’
Gashmeer Mahajani
Also Check
Ishalwadi | ईशाळवाडी पुनर्वसनासाठी बालाजी फाउंडेशनकडून २५ लाखांची मदत