Image Source
Gadar 2 Vs OMG 2 | उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली आणि हरयाणा याठिकाणी दोन्ही चित्रपटांसाठी प्रेक्षकांमध्ये क्रेझ पहायला मिळतेय. सोमवारी या दोन्ही चित्रपटांची खरी परीक्षा असेल. मात्र मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी सुट्टीचा दिवस असल्याने थिएटरमध्ये पुन्हा गर्दी झाली होती.
चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवलेले सर्व अंदाज जवळपास खरे ठरत आहेत. हाऊसफुल शो आणि कलेक्शनच्या बाबतीत हा वीकेंड हिंदी चित्रपटांसाठी आतापर्यंतचा सर्वांत मोठा वीकेंड ठरला आहे. ‘गदर 2’ने पहिल्या तीन दिवसांत तब्बल 130 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला. तर ‘OMG 2’ने या तीन दिवसांत जवळपास 43 कोटी रुपयांची कमाई केली. या दोन्ही चित्रपटांची कमाई जोडली तर हा आकडा 173 कोटी रुपयांच्या घरात पोहोचले. तर शाहरुखच्या ‘पठाण’ने तीन दिवसांत 167 कोटी रुपये कमावले होते.
चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’ हा एकच चित्रपट त्यावेळी प्रदर्शित झाला होता. त्याची दुसऱ्या कोणत्या चित्रपटाशी टक्कर नव्हती. जर ‘Gadar 2’सुद्धा सिंगल रिलीज झाला असता तर त्याच्या कमाईची बरोबरी थेट ‘पठाण’शी झाली असती. सध्या ‘गदर 2’ या चित्रपटाची टक्कर अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ आणि रजनीकांत यांच्या ‘जेलर’शी होतेय.
#OneWordReview…#Gadar2: BLOCKBUSTER.
Rating: ⭐️⭐️⭐️⭐️½#Gadar2 is old-school desi entertainment at its best… #SunnyDeol returns to the big screen with a vengeance… He is as ferocious as ever… #Gadar2 will create #Gadar at the #BO… The patriotic flavour coupled with… pic.twitter.com/nA1yY79p6B— taran adarsh (@taran_adarsh) August 11, 2023
उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली आणि हरयाणा याठिकाणी दोन्ही चित्रपटांसाठी प्रेक्षकांमध्ये क्रेझ पहायला मिळतेय. सोमवारी या दोन्ही चित्रपटांची खरी परीक्षा असेल. मात्र मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी सुट्टीचा दिवस असल्याने थिएटरमध्ये पुन्हा गर्दी झाली होती. प्रेक्षकांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून या चित्रपटांचे शोज वाढवले जात आहेत. माऊथ पब्लिसिटीचा या दोन्ही चित्रपटांना फायदा होताना दिसतोय.
लॉकडाऊननंतर थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात बरेच बॉलिवूड चित्रपट अपयशी ठरले. त्याच वेळी दाक्षिणात्य चित्रपटांची लाट आली. ‘पठाण’शिवाय ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता पहिल्याप्रमाणे पुन्हा एकदा शोज हाऊसफुल होऊ लागले आहेत.
Check Also
Gashmeer Mahajani | वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनी पुन्हा एकदा व्यक्त