सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय जैन संघटनेने राज्यातील अनाथ मुला- मुलींचे मोफत संगोपन आणि शिक्षण देण्याची जबाबदारी स्विकारली आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी – 6 वी च्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीनां १२ वी पर्यंतचे शिक्षण, निवास, भोजन, शिक्षण साहित्य, आरोग्य तपासणी आणि औषधे आदींची मोफत सोय वाघोली पुनर्वसन प्रकल्प येथे केली जाणार आहे.
प्रवेशासाठी अट असून यामध्ये आई किंवा वडील यापैकी एकाचा किंवा दोघांचा मृत्यु कोविड-१९ किंवा शेतकरी आत्महत्या असेल अशा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. इयत्ता 5 वी साठी 50 आणि इयत्ता 6 वी साठी 30 मुला-मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे.
इच्छुकांनी खालील दिलेला फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे जोडून, फॉर्म अध्यक्ष, प्रबंध समिती, भारतीय जैन संघटनेकडे लवकरात लवकर पाठवावा. (पालकांचे संमती पत्र, प्रवेशअर्जा बरोबर खालील कागदपत्राच्या सर्व प्रति झेरॉक्स हव्या असून साक्षांकित (True Copy) केलेल्या असाव्यात.)
अधिक माहितीसाठी श्री. साळुंखे 7722018586, सविता सुतार 9860105326 यांच्याशी संपर्क साधावा. नाव नोंदणी bit.ly/BJS_WERC_Adm या लिंक वर करता येईल.