मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभांसाठी आवाहन; राष्ट्रीय मत्स्य विकास पोर्टलवर नोंदणी करा
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाशी संबधित व्यक्ती व संस्था यांनी राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डीजिटल प्लॅटफॉर्म (एन.एफ.डी.पी) पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय रत्नाकर राजम यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व वैयक्तिक मच्छिमार, मत्स्यसवंर्धक/ (पीएमएमएसवाय) PMMSY लाभार्थी तसेच सर्व मच्छिमार सहकारी संस्था, मत्स्यव्यवसाय विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणेसाठी राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डीजिटल प्लॅटफॉर्म (एन.एफ.डी.पी) पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक आहे.
सदरची नोंदणी https://NFDP.dof.gov.in या लिंकवर स्वतः किंवा नजीकच्या सीएससी केंद्रात आधारकार्ड, बँक पासबुक यासह जाऊन विनामुल्य करता येईल. ई-श्रम कार्डसाठीची नोंदणी https://eshram.gov.in या लिंकवर करावी.
अपघात गट विमा नोंदणीबाबतची ३१ कॉलमची माहिती तसेच के.सी.सी बाबतची माहिती या कार्यालयात सादर करावी, असेही सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय राजम यांनी कळविले आहे.