सोलापूर : प्रतिनिधी
येथील श्री. सिध्देश्वर सहकारी साखर कारखाण्याची अनधिकृत चिमणी पाडण्याबाबत गेल्या 4 ते 5 वर्षांपासून सामाजिक संघटना, त्यांच्याआडून राजकारण करणारे नेते, इतर कारखाण्याचे सभापती व सदस्य यांचे राजकारण सुरू होते व आहे. या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यावर वेळेत निर्णय न झाल्याने प्रकरण कोर्टामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र कोर्टाने अंतिम निर्णय दिल्याने अखेर श्री. सिध्देश्वर साखर कारखाण्याच्या चिमणी पाडकाम प्रक्रीयेला बुधवारी पहाटे 4 वाजल्यापासुन सुरवात करण्यात आली आहे.
कारखाण्याची चिमणी पाडण्यासाठी मागवण्यात आलेले जेसीबी.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
यापूर्वी कारखाण्याची चिमणी पाडण्यासाठीची तयारी पूर्ण झाली होती. चिमणी पाडण्यासाठी पथक दाखल होताच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा जमाव येऊन त्यास विरोध केला होता. परिणामी यावेळी मुंबई, पुणे,हडपसर या भागातील एसआरपी तुकड्या मागविल्याची माहिती असून त्याचबरोबर होमगार्ड, पोलिस यांच्या सुट्ट्या पुढील आदेश येईपर्यंत रद्द करून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला आहे.
चिमणी पाडकामास विरोध करण्यासाठी माकपचे कार्यकर्ते कारखाणा परिसरात दाखल
पोलीस प्रशासनाने सिध्देश्वर साखर कारखान्याकडे जाणारे सर्व मार्ग बंद केले आहेत.
- श्री. सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना परिसरातील घडामोडी
- चिमणी पाडण्याला कारखान्याचे कर्मचारी आणि शेतकरी सभासदांमधून तीव्र विरोध.
- जवळपास 2 हजारहून अधिक पोलिसांचा कारखाना परिसरात फौजफाटा.
- सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या 1 किलोमीटर परीसरात जमावबंदीचा आदेश
- सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात फौजदार दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये जमावबंदी आदेश लागू.
- श्री. सिध्देश्वर साखर कारखाना परिसराच्या 1 किलोमिटर परिघात कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक सेवा वगळता संचार करण्यास प्रतिबंध.
- कारखाना परिसरातील 1 किलोमिटर परिघात असलेले सर्व सभागृह, मंगल कार्यालय, रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स्, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे बंद.
- आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय दंड संहीतेचे कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र. सिद्धेश्वर कारखान्याकडे जाणारे सर्व रस्ते सहा दिवसासाठी बंद