एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान: शीतखोली घटकासाठी अर्थसहाय योजना
By assal solapuri ।।
सोलापूर : जिल्ह्यातील सर्वसाधारण, अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती व इतर सर्व प्रवर्गातील शेतक-यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम योजनेतर्गंत काढणीपश्चात व्यवस्थापण घटकांतर्गत शितखोली या घटकासाठी महा-डीबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
-
प्रकल्पाचे तांत्रिक निकष :- कमाल प्रकल्प क्षमता३० मे. टन प्रतिदिवस प्रति युनिट असणे आवश्यक राहील. शीतखोलीची क्षमता 30 मे. टनापेक्षा कमी असल्यास यथाप्रमाणाआधारे (Prorata Basis) अनुदान अनुज्ञेय राहील. तथापि, किमान प्रकल्पक्षमता ५ मे. टन प्रति युनिट असणे आवश्यक राहील.
-
शीतखोलीस सौर / अक्षय ऊर्जा स्त्रोत वापरल्यास 100 टक्के कर रक्कम प्रकल्प खर्चात ग्राह्य धरण्यात येईल.
-
अर्थसहाय्याचे स्वरुप :- सर्वसाधारण क्षेत्रासाठी साठवण क्षमता विचारात घेवून ग्राहय भांडवली प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा कमाल रु. ५.२५ लाख अर्थसहाय्य देय आहे. अर्थसहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राहय धरण्यात येतील.
-
लाभार्थी निवडीचे निकष :- शेतकरी, शेतकरी उत्पादक गट, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी २५ सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, वैयक्तिक शेतकरी, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट (ज्यामध्ये किमान १५ सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, शेतकरी गट यांचेसाठी अर्थसहाय्य हे बँक कर्जाशी निगडीत बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरुपात अनुदान देय राहील.
-
जिल्हयातील सर्वसाधारण, अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती व इतर सर्व प्रवर्गातील शेतक-यांनी या घटकाचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधीत नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषीअधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.