Image Source
सत्ताकारण न्युज नेटवर्क टीम
Headphone & Earphones : आपल्यापैकी अनेक जण दररोज इअरफोन आणि हेडफोनचा वापर करतात. इअरफोन आपण सहसा फोन-कॉलसाठी वापरतो, तर हेडफोन आपण गाणी ऐकताना, चित्रपट पाहताना किंवा ऑनलाइन गेम खेळताना वापरतो; पण तुम्हाला माहिती आहे का इअरफोन आणि हेडफोन या दोन्हीपैकी कशाचा वापर करणे चांगले आहे? आज आपण त्याविषयीच जाणून घेऊ या.
Earphone आणि Headphone आरोग्यासाठी चांगले नाही, असे अनेक रिसर्चमधून समोर आले आहे. मुळात आवाज आणि ऐकण्याच्या कालावधीवर अवलंबून आहे की हेडफोन किंवा इअरफोन आरोग्यावर किती विपरीत परिणाम करू शकतात.
ज्याप्रमाणे इअरफोनच्या आवाजामुळे धोका निर्माण होतो, त्याप्रमाणे हेडफोनच्या अतिवापरामुळेही इअर इन्फेक्शन होऊ शकते. हेडफोन पूर्ण कानात उष्णता निर्माण करतो; ज्यामुळे बॅक्टेरिया वाढतात आणि सहजपणे इन्फेक्शन होते. पण, काही संशोधनामध्ये असे सांगितले आहे, की हेडफोनमुळे इअर इन्फेक्शनचा धोका निर्माण होत नाही.
इअरफोन आकाराने लहान असल्यामुळे कानात फिट बसतात; त्यात बाहेरचा आवाजही तुम्हाला सहजपणे ऐकू येतो. पण, बाहेरचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून तुम्ही जर इअरफोनचा आवाज वाढवत असाल, तर ते आरोग्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकते.
आवाजाचा विचार केला, तर हेडफोन तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. कारण- हेडफोन वापरताना बाहेरचा आवाज येत नाही आणि तुम्ही कमी आवाजात गाणी ऐकू शकता.
Headphone वापर तुम्ही तासन् तास करीत असाल, तर ही सवय तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. जर तुम्ही एक तास सातत्याने गाणी ऐकत असाल, तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या कानावर होऊ शकतो.
एका एमपी3 प्लेअरमधून इअरफोनमध्ये १०० डेसिबल आवाज येऊ शकतो. इतका आवाज तुमच्या कानाच्या आरोग्यासाठी चांगला नाही. वैज्ञानिक सांगतात की, ८५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज आपल्या कानांसाठी धोकादायक आहे.
Check Also