‘सिंहगड’मध्ये ‘डीस्टा 2के23’ उत्साहात संपन्न

Sinhgad Colge

सोलापूर : प्रतिनिधी

केगांव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘डीस्टा 2के23’ नॅशनल लेव्हल टेक्निकल इव्हेंट संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डूरॉक्रेट इंजिनीअरिंग सर्व्हिस प्रा. ली. चे जनरल मॅनेजर रवींद्र जगताप आणि सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे, डॉ. शेखर जगदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रमूख पाहुणे रवींद्र जगताप यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, रोजगार उपलब्ध करण्यासाठी लागणारे कौशल्य व यशस्वी कारकिर्दीसाठी आवश्यक असणारे अंगभूत गुण याबद्दल त्यांनी माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी डीस्टा 2के23 मध्ये कॅडवार, क्विझ, ट्रेझर हंट, ब्रेन बझ्झेर, टेक्नोव्हेशन आयडिया, प्रेझेंटेशन, टेक बझ,  हग्ज फॉर बग्ज, व्हेलोरंट, आयडिया शोडाऊन, सर्किट डेबगिंग, मिनी रेडीओस या विविध स्पर्धेमधून एकूण 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमेध पाठक यांनी केले. सूत्रसंचालन सानिया हकीम आणि अपूर्व एडके यांनी केले. आभार डॉ. एस. एस. शिरगण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्टूडेंट कौन्सिलचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *