तातडीच्या मदतीचे आश्वासन
अस्सल सोलापुरी ||
Deputy Chief Minister Ajit Pawar यांनी लांबोटी गावाला भेट दिली. अतिवृष्टी व धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग झाला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र आहे. (Promise of urgent help) शासनाकडून तातडीने पंचनामे करून पूरग्रस्तांना मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मुसळधार पावसामुळे आणि धरणातून दोन लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग (Two lakh cusecs of water) झाला आहे. त्यामुळे लांबोटी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

शेतजमिनी, घरे, मंदिरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे पिकेही नष्ट झाली आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे सव्वाचार हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती मदत दिली जाईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.
सोलापूर-पुणे महामार्गावरील लांबोटी येथील पुलावरून पाणी पातळी वाढली आहे. जड वाहतूकीस सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा एकेरी मार्गाने सुरू ठेवण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या पाहणी दौऱ्यात निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, मोहोळचे आमदार राजू खरे, माजी आमदार राजन पाटील यांच्यासह नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
