क्रिकेट विशेष..! दस का दम नव्हे तर पुरा सौ  का दम!

पहिल्याच  चेंडूपासून फटकेबाजी करणाऱ्या ईशान किशन नावाच्या बिहारी बाबूने स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केले!

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

होय, पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करणाऱ्या ईशान किशन नावाच्या बिहारी  बाबूने दाखवून दिले आहे. हे तितकेच खर आणि सत्यही आहे. दस का दम नव्हे तर पुरा सौ  का दम! असल्याचे भारतीय क्रिकेटमधील एक दबलेला अतिशय घातक असा दबंग बिहारचा क्रिकेटर यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने सिद्ध केले आहे. अर्थात त्याने दाखवून दिले आहे की बिहारी बाबू किसीसे  कुछ कम नही है! यासोबतच त्याने तमाम क्रिकेटप्रेमी  चाहत्यांचे लक्षही आपणकडे वेधून घेतले आहे. केवळ भारतीयचं नव्हे तर भले भले क्रिकेटमधील आजी-माजी, खेळाडू, विश्लेषक  आणि तज्ञ मंडळी सध्या त्याच्यावर कौतुकाची स्तुतिसुमने उधळताना दिसून येत आहेत. पाकिस्तानातील क्रिकेटप्रेमींसह आजी-माजी ज्येष्ठ खेळाडूदेखील कुठे मागे राहणाऱ्यांपैकी नव्हतेच. त्यांनी देखील या भारतीय  खेळाडूचे तोंडभरून कौतुक केले.

आयपीएलच्या सन २०२५  या सत्रातील दुसऱ्याच सामन्यामध्ये आपल्या एका धडाकेबाज कामगिरीने  तो लक्षवेधी ठरला. आयपीएलच्या या मोसमातील आपल्या नवख्या सनरायजर्स हैदराबाद या संघाकडून खेळताना संघाच्या आणि संघाकडून पहिल्याच सामन्यात खेळताना त्याने दमदार शतकी कामगिरी केली. त्याने ४७ चेंडूत १०६ धावांची सुरेख कामगिरी केली. त्याने ११ चौकार आणि सहा षटकार खेचले. या खेळीमध्ये त्याची स्ट्राईक रेट २२५.५३ ची होती. यावरून तो किती फायर होता हे दिसून येईल. ईशान किशन म्हणजे हा भारतीय क्रिकेटला लाभलेला एक नवा फायर ब्रॅंडच म्हणावं लागेल.

  • पण दुर्दैवच! हे दुर्दैव नेमके कोणाचे आणि का? खरंच..  दुर्दैवी.. कोण? ईशान किशन की.. टीम इंडिया. सध्या आयपीएल सुरू आहे त्यामुळे टीम इंडियाचा हा विषय जरा बाजूलाच ठेवू यात. नेहमी मुंबई  इंडियन्स या संघाकडून आयपीएलमध्ये खेळणारा आणि  निळ्या जर्सीतील ईशान किशन हा सनरायजर्स हैदराबाद या संघाच्या ‘फायरी हीट’मध्ये खेळताना दिसतोय.  पिंक आर्मी या नावाने मशहूर सनराइजर्स हैदराबादने यंदा आपल्या  जर्सीमध्ये  क्रांतिकारी बदल केला आहे.  जर्सी SA20 चा  संघ सनराइजर्स ईस्टर्न केपने अतिशय प्रभावित आहे. त्यामुळे  या जर्सीला   ‘फायरी हीट’ असे नाव देण्यात आले आहे . नारंगी रंगाचे  फाऊंडेशन आहे. संपूर्ण भागात काळ्या  रंगाचे डिझाइन  आणि  लोअर ब्लॅकमध्ये आहे.

यंदा त्याला मुंबई इंडियन्स  संघाने घेतले नाही पण सनरायजर्स हैदराबादने त्याची दखल घेतली त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याने ते आपल्या खेळीने सिद्धही करून दाखवले. सध्या  दुर्दैव हे  टीम इंडियाला लागलेले एक ग्राहणच आहे. होय, असेच म्हणावे लागेल. सध्या टीम  इंडियामध्ये खेळांडूची रस्सीखेच, स्पर्धाच सुरू आहे. सिलेक्टरची जो पहिली पसंत त्याची संघात वर्णी अशी परिस्थिती आहे. एक काळ  असा होता जेंव्हा राहुल द्रविड, संजय मांजरेकर, रॉबिन उथप्पा, दिनेश कार्तिक  यांना विकेट कीपिंग (यष्टीरक्षण) करावे लागले. मात्र सध्याची परिस्थिती वेगळी आहे . आता कीपर्सना टीम इंडियात पक्के स्थान पटकावण्यासाठी झुंजावे लागत आहे. स्पर्धा लागली आहे. त्यामध्येच ईशान किशन हा दुर्दैवी ठरत आहे. ईशान किशनला सध्या केएल राहुल, संजू समसंग, ऋषभ पंत, ध्रुव  जुरेल, जितेश शर्मा यासारख्या दिग्गज यष्टीरक्षकांच्या स्पर्धेतून जावे लागत आहे. अशातच टी-२०, वन-डे  आणि कसोटी  अशा स्वरूपाच्या क्रिकेटसाठी वेगवेगळे संघ निवडले जात आहे. यष्टीरक्षक यांचीदेखील निवड याच धर्तीवर  होत आहे.

सध्याचे हे सर्वच यष्टीरक्षक धडाखेबाज कामगिरी करीत आहेत. जणू एक स्पर्धाच लागली आहे. सरस कामगिरी करूनही चढता आलेख असतानाही वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफीसह विदेशी दौऱ्यावर जाणाऱ्या संघात यष्टीरक्षक निवडताना निवडकर्त्यांची जणूकाही  गळचेपीच होत असते. शेवटी काही निकषांच्या आधारे संघ निवडले जाते. यामध्ये काहींना वगळले जाते. तेंव्हा मात्र एखाद्या खेळाडूवर अन्याय झाला, जाणून बुजून निवडकर्त्यानी वगळले, राजकारण केले जाते, अशी ओरड होते. यालाच एखाद्याचे नशीब अर्थात दुर्दैव म्हणावे लागेल. म्हणूनच आता कोणतीही मालिका असो, यांना झगडावे लागणार आहे. संघर्ष  करावे लागणार आहे. कामगिरीत सातत्य ठेवावेच लागणार आहे.

आपल्या कामगिरीच्या जोरावर निवडकर्त्यांचे लक्ष वेधावे लागणार आहे. त्यांना संघात आपल्या  निवडीसाठी भाग पाडावे लागणार आहे. अशी परिस्थिती निर्माण करावी लागणार आहे की संघात आपली निवड झालीच पाहिजे आणि करावयास भाग पडलेच पाहिजे. वेळप्रसंगी  एका  संघात दोन यष्टीरक्षक निवडण्याचा पेच आणि वेळ निवडकर्त्यावर आणावी लागेल त्यांना भाग पाडावे लागेल. आणखी एक महत्वाचा मुद्दा या निमित्ताने सांगावे लागणार आहे. ते म्हणजे बीसीसीआयच्या खेळाडूबाबतच्या नियम व अटी आणि त्यांच्या काही आचार संहिता. यातून मग कोणीही सुटणे शक्य नसते. यानिमित्ताने बस एवढेच सांगावेसे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *