– उद्योगपती संजय आवताडे
पंढरपूर : प्रतिनिधी
आधुनिकतेची कास धरलेल्या व तांत्रिकदृष्ट्या पुढारलेल्या या विश्वामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी आत्मसात करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे संगणक होय. शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना संगणक या तांत्रिक प्रणालीचा जास्तीत जास्त सहवास लाभावा. त्यांच्या चौकस नैतिक विचारक्षमतेला वाव मिळावा. यासाठी आमदार दादासाहेब यांच्या माध्यमातून साकार झालेले हे संगणक दालन निश्चितपणे उपयोगी पडेल, असा विश्वास उद्योगपती संजय आवताडे यांनी व्यक्त केला.
इंदिरा शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित कर्मवीर औदुंबररावजी पाटील विद्यालय, पंढरपूर या ज्ञानसंकुलामध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या “डॉ. बाबासाहेब आंबेडकर संगणक कक्ष” या तांत्रिक दालनाचा शुभारंभ उद्योगपती संजय आवताडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी कर्मवीर औदुंबररावजी पाटील विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.