
सोलापूर : प्रतिनिधी
जागतिक आरोग्य दिनानिमित्त 7 ते 14 एप्रिल 2023 दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सर्व आरोग्य संस्थांमध्ये “सुंदर माझा दवाखाना” या संकल्पनेतून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
या यावर्षीचे जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य “सर्वांसाठी समान आरोग्य सुविधा, सर्वांसाठी आरोग्य” असुन आरोग्यसेवा अधिकाधिक लोकभिमुख व्हावी. आरोग्यसेवा पुरवणारी संस्था भौतिक सोयी सुविधायुक्त राहावेत. या अनुषंगाने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने जागतिक आरोग्य दिन 7 ते 14 एप्रिल दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये “सुंदर माझा दवाखाना” हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमात स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. यामध्ये आरोग्य संस्था सभोवतालचा परिसर, सर्व वार्ड विभाग, स्वच्छता ग्रहे, भंडार ग्रहे इत्यादी स्वच्छता करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे आरोग्य संस्थेच्या आवारात व दर्शनी भागात सुशोभीकरण, रंगरंगोटी आणि आरोग्य संस्थेला जनतेला देण्यात येणाऱ्या सेवांचे फलक लावण्यात आले आहेत. या उपक्रमात जिल्ह्यातील 77 प्राथमिक आरोग्य केंद्र 431 उपकेंद्रांचा समावेश आहे. या उपक्रमामध्ये सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचा सहभाग होता.
जिल्ह्यामधील मोहोळ तालुक्यातील चार आरोग्य संस्थेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी भेट देत जनतेला जास्तीत जास्त आरोग्य सेवा देण्याच्या व इतर कामकाजाबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या.