कोल्हापुरात मुलाची चोरी, सोलापुरात लागला छडा

Child theft in Kolhapur
Child theft in KolhaPUR

सोलापूर : प्रतिनिधी

कोल्हापुरातून एका 6 वर्षांच्या चिमुरड्याची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. यासाठी पोलिसांनी जवळपास 100 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. अखेर याचा छडा पोलिसांनी सोलापुरात 48 तासात लावला.

कोल्हापूरच्या बाळूमामा मंदिर परिसरामधून एका दाम्पत्याने मुलाला चोरलले होते. पोलिसांनी (Police) अवघ्या 48 तासांमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यातल्या जवळा गावातून या मुलाची सुटका केली आहे. या मुलाच्या चोरीची दृष्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. यानंतर मुलाला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यामुळे पोलिसांनी तब्बल 100 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.

कोल्हापूरच्या बाळूमामा मंदिरापासून सुरू झालेला हा प्रवास सोलापूर जिल्ह्यातल्या जवळा गावापर्यंत पोहोचला. तिथे जाऊन मुलाची सुटकाही करण्यात आली. या प्रकरणी आरोपी मोहन शितोळे आणि त्याची पत्नी छाया शितोळे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपी दाम्पत्याला मुले नाहीत. त्यामुळे त्यांनी या मुलाला आमिष दाखवले आणि त्याला चोरून नेले. 48 तासांमध्ये आरोपींना अटक करून मुलाची सुटका केल्यामुळे पोलिसांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला आहे. मागच्या काही काळामध्ये मुलांना चोरून नेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या मुलांचा शोध घेणे पोलिसांसाठीही बरेच वेळा आव्हानात्मक काम असते, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मुलांचा हात न सोडलेलंच बरं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *