थ्रोबॉल : एस.आर. चंडक इंग्लिश हायस्कूलच्या संघास तिहेरी विजेतेपद

थ्रोबॉल : एस.आर. चंडक इंग्लिश हायस्कूलच्या संघास तिहेरी विजेतेपद

By assal solapuri||

सोलापूर : थ्रोबॉल स्पर्धेमध्ये एस.आर.चंडक इंग्लिश हायस्कूलच्या तीन संघाने विजेतेपद पटकावले आहे. श्रोबॉल असोसिएशन सोलापूर यांच्यावतीने सोलापूर शहर व जिल्हा सब जुनिअर व ज्युनिअर आमंत्रित मुला-मुलींच्या स्पर्धा छत्रपती शिवाजी प्रशाला, सरस्वती चौक येथे पार पडल्या. यामध्ये  एस. आर. चंडक इंग्लिश हायस्कूलमधील खेळाडूनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये प्रशालेने घवघवीत यश संपादन करून प्रशालेतील तीन संघांनी विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत दोन मुलींचा संघ अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.  या स्पर्धेमध्ये  १७ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले. १९ वर्षे वायोगातालील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले. याच गटातील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. १९ वर्षे वयोगटातील मुलींचा संघ  व्दितीय आला.

या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक विठठल सरवदे, धर्मराज कट्टीमनी यांचे मार्गदर्शन लाभले.  त्यांचे प्रशालेचे चेअरमन योगेश बियाणी,  सचिव डॉ. अर्चना दरक, सहसचिव   स्वप्निल मर्दा.   गिरीधारी भुतडा,   ओमप्रकाश सोमाणी,  विष्णुकांत  मानधनिया,   संजय  डागा,   प्रमोद भुतडा,   संजय  करवा,   जितेंद्र  राठी,   राहुल चंडक,   शैलेश  चंडक,   सपना  राठी, डॉ. सारिका झंवर, सी.ए. जोत्स्ना  भड्ड,  . नैना  राठी व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका   शालिनी सिंघल, पर्यवेक्षिका   अंजली चव्हाण यांनी   अभिनंदन केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *