
धक्कादायक सोलापुरातील भारत नगर कुमठा नाका येथे 14 वर्षीय बालकाने घेतला गळफास
सोलापुरातील भारत नगर कुमठा नाका येथे 14 वर्षीय बालकाने घेतला गळफास. याबाबत मिळालेले अधिक माहिती अशी की, सोलापूर शहरातील भारत नगर कुमठा नाका येथे निशांत वन्नप्पा हुल्ले वय वर्ष 14 या मुलाने राहत्या घरी अज्ञात कारणावरून साडीच्या साह्याने गळाफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. दरम्यान नातेवाईकांनी सदरील मुलाला बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटल येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सदरील घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीमध्ये झाली आहे. संबंधित घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.