BMW Car : BMW कारची किंमत ही किमान ५० ते ६० लाख रुपये असते. पण या मंडळींनी तर एक पैसा खर्च न करता समुद्र किनाऱ्यावर फुकट मिळणाऱ्या वाळूनं ही कार तयार केलीये.
काही लोकं ही फारच क्रिएटिव्ह असतात. ही मंडळी कधी काय तयार करतील सांगता येत नाही. अशाच एक सर्जनशील तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यानं चक्क वाळूपासून BMW कार तयार केलीये. विश्वास बसत नाहिये? तर मग हा व्हिडीओ पाहा. या व्हिडीओमध्ये त्यानं कार तयार करण्याची प्रोसेस दाखवलीये. एका BMW कारची किंमत ही किमान ५० ते ६० लाख रुपये असते. पण या मंडळींनी तर एक पैसा खर्च न करता समुद्र किनाऱ्यावर फुकट मिळणाऱ्या वाळूनं ही कार तयार केलीये. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही देखील अवाक् व्हाल.
हा व्हिडीओ artistic_viral या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्वात आधी त्यानं एक भलामोठा वाळूचा ढिगारा केला. मग त्याला व्यवस्थित आकार देऊन एक मोठा ठोकळा तयार केला. पुढे या ठोकळ्यावर कोरीव काम करून गाडी तयार केली. बरं ही गाडी तयार करणं दिसतं तितकं सोपं नाही. थोडासा जरी अंदाज चुकला तरी केलेल्या मेहनतीवर पाणी फिरू शकतं. पण तरुण फारच अनुभवी आहे. त्यानं अत्यंत सावधपणे वाळूवर कोरीव काम करून ही BMW गाडी तयार केली. या गाडीचा मेकिंग व्हिडीओ तुम्ही देखील एकदा पाहाच. अन् हो तुम्हाला ही गाडी कशी वाटली ते देखील सांगायला विसरू नका
हे पाहा अशी तयार केली
View this post on Instagram