BPSC Admit Card 2025: बिहार लोकसेवा आयोगाची  71 वी प्रिलिम्स प्रवेशपत्र जारी

बीपीएससीची 71 वी प्रिलिम्स प्रवेशपत्र: 2025  जारी

 

By Assal Solapuri ||

BPSC Admit Card 2025 : बिहार लोकसेवा आयोगाने बीपीएससी 71 वी प्रिलिम्स प्रवेशपत्र: 2025  जारी केले आहे. अशी माहिती बिहार लोकसेवा आयोगाच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

बिहार लोकसेवा आयोगाने शनिवार, दि. 6 सप्टेंबर 2025 रोजी बीपीएससी 71 वी प्रिलिम्स प्रवेशपत्र 2025 (BPSC Admit Card 2025) 71 व्या संयुक्त  (प्राथमिक) स्पर्धा परीक्षा (सीसीई) प्रवेशपत्र (हॉल तिकीट)  जारी केले आहे.

 

BPSC WEBSITE :    प्राथमिक परीक्षेला बसणारे उमेदवार बीपीएससीच्या अधिकृत वेबसाईट bpsc.bihar.gov.in वरून हॉल तिकीट डाउनलोड करता येईल. प्रवेशपत्र bpsconline.bihar.gov.in वेबसाईटवरदेखील उपलब्ध असेल.

 

71  व्या बीपीएससी परीक्षेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बिहार लोकसेवा आयोगाचे परीक्षा नियंत्रक राजेश कुमार, सहसचिव कुंदन कुमार आणि सचिव सत्यप्रकाश शर्मा उपस्थित होते.

यावेळी सत्यप्रकाश शर्मा म्हणाले, 1298 पदांसाठी सुमारे 470528 अर्ज प्राप्त झाले आहेत. बिहार लोकसेवा आयोगाने दि. 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. ही परीक्षा दुपारी 12  ते 2  यावेळेत होणार आहे. प्रवेशपत्र सात  दिवस आधीच डाऊनलोड केले जाईल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *