महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल

सोलापूर : प्रतिनिधी

रस्त्याच्या कामावरील दगड उडून लागल्याने त्याची तक्रार करणाऱ्या महिलेला जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच तिचा विनयभंग केल्याप्रकरणी महानगरपालिकेच्या तीन अधिकाऱ्यांविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महापालिकेच्या तपन डंके, रामकृष्ण कोमलु व अंबादास शिंदे या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पिडित महिलेने फिर्याद दाखल केली आहे. तिच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर सरकारी रस्त्याचे काम चालू होते. त्याठिकाणचे कामगार दगड रस्त्यावर टाकत होते. यावेळी घरासमोरील दोरीवर कपडे वाळत घालणाऱ्या पिडितेला रस्त्यावरील दगड उडून लागला. यामुळे पिडित महिला संबंधीत ठेकेदारास दगड लागल्याचे सांगण्यासाठी गेली होती. यावेळी तेथील महानगरपालिकेचे अधिकारी तपन डंके, रामकृष्ण कोमलू, अंबादास शिंदे यांनी तिला जातिवाचक शिवीगाळ केली. तिच्या हाताला धरून ढकलून दिले. तसेच झोंबाझोंबी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त मोरे करीत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *