Asia Cup IND vs PAK | भारत – पाकिस्तान सामन्यावर पाणी फिरणार ??

Asia Cup IND vs PAK

Image Source

Asia Cup IND vs PAK Rain : भारत आणि पाकिस्तान सामन्याची वाट फक्त दोन्ही देशातील चाहतेच नाही तर ब्रॉडकास्टर देखील पाहत आसतात. या दोन ते तीन महिन्यात भारत आणि पाकिस्तान हे अनेकवेळा आमने सामने येणार आहेत.

याची सुरूवात उद्या (दि. 2 सप्टेंबर) श्रीलंकेतील कँडी येथू सुरू होणार आहे. मात्र पहिल्याच भारत – पाकिस्तान सामन्यावर पावसाचे ढग दाटले आहेत. Asia Cup IND vs PAK

भारत – पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्यावेळीत श्रीलंकेतील कँडीला बालागोल्ला वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. भारत – पाकिस्तान सामन्यांची तिकीटे काही मिनिटातच विकली जातात. हा सामना देखील त्याला अपवाद नाही. मात्र पावसामुळे चाहत्यांची घोर निराशा होण्याची शक्यता आहे. (Asia Cup 2023 India Vs Pakistan Match Weather Update) Asia Cup IND vs PAK

आशिया कपमध्ये 4 सामने पाकिस्तान येथे तर 9 सामने श्रीलंकेत खेळले जाणार आहेत. पाकिस्तानमध्ये उद्घाटनाचा सामना झाला आहे. तेथे पावसाचा कोणताही व्यत्यय नव्हता. मात्र भारत – पाकिस्तान सामन्यात पावसाची दाट शक्यता आहे. Asia Cup IND vs PAK

या सामन्यात पावसाची शक्यता ही 60 टक्के आहे. पाऊस साधारणपणे संध्याकाळी 5.30 ला सुरू होईल. श्रीलंकेच्या हवामान विभागाने देशाच्या अनेक भागात काही दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. कँडी हे केंद्रीय प्रांतात येतं. इथं शुक्रवारी आणि शनिवारी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Asia Cup IND vs PAK

हवामान विभागाने बुधवारच्या आपल्या बुलेटीनमध्ये सांगितले की, ‘पश्चिम, सबरागमुवा, केंद्रीय आणि उत्तरी प्रांतात तसेच गाले आणि मतारा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. हा पाऊस जोरदार असण्याची शक्यता आहे. पश्चिम,सबरागमुवा प्रांत आणि गाले आणि मतारा जिल्ह्यात जवळपास 75 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्याता आहे.’

हेही वाचा

PAK vs NEP Asia Cup | नेपाळ पहिल्यांदाच आशिया कपसाठी मैदानात!

Rohit Sharma | रोहितची कॅप्टन्सी, चौथ्या क्रमांकावर कोण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *