भारत चौथ्यांदा आशिया कप विजेता बनला, कोरियाला ४-१ ने हरवून विश्वचषकासाठी पात्र ठरला
By Assal Solapuri||
INDIA V/s S. KOREA; ASIA CUP HOCKEY FINAL : आशिया कप हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण कोरियावर 4-1 अशा गोलने पराभव करीत ऐतिहासिक विजयी कामगिरी केली आहे. अंतिम सामना जिंकून भारत 2026 च्या एफआयएच विश्वचषकासाठी पात्र (FIH WORLD CUP: 2026 QUALIFY) ठरला आहे.
(RAJGIR, BIHAR) बिहारमधील राजगीर येथे झालेल्या आशिया कप: 2025 हॉकी स्पर्धेच्या (FINAL MATCH) अंतिम सामन्यात भारताने पाच वेळचा विजेता कोरिया संघाचा 4-1 असा विजय मिळवत (GOLD MEDAL) सुवर्णपदक पटकावले. भारताने आशिया कपचे विजेतेपद पटकावण्याची ही चौथी वेळ आहे. या स्पर्धेत संघाने एकही सामना गमावला नाही. चीनला 7-1 ने हरवून येथे पोहोचलेल्या टीम इंडियाने कोरियाविरुद्ध 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. अंतिम सामन्यात भारताने (DILPREET SINGH) दिलप्रीत सिंगच्या दोन गोलच्या मदतीने पाच वेळचा आशिया कप विजेत्या कोरियाचा एकतर्फी पराभव केला.

भारताकडून (SUKHJEET SINGH) सुखजीत सिंगने पहिल्याच मिनिटाला गोल केला. दिलप्रीतने 28 व्या आणि 45 व्या मिनिटाला गोल केला. (AMIT ROHIDAS) अमित रोहिदासने 50 व्या मिनिटाला चौथा गोल केला. दुसरीकडे, पाच वेळा विजेत्या दक्षिण कोरियाचा एकमेव गोल (DAIN SON) डॅन सनने 51 व्या मिनिटाला केला. भारताने स्पर्धेत पाच विजय नोंदवले आणि एक बरोबरी साधली. (HARMANPREET SINGH) हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने सर्व तीन पूल सामने जिंकले आहेत. सुपर 4 मध्ये भारताने मलेशियाचा 4-1 आणि चीनचा 7-0 असा पराभव केला. कोरियासोबतचा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला.
यापूर्वी भारताने 2003, 2004, 2007 आणि 2017 मध्ये विजेतेपद पटकावले होते. दक्षिण कोरिया सन 1994, 1999, 2009, 2013 आणि 2022 असा पाच वेळचा विजेता राहिलेला आहे. आगामी विश्वचषक स्पर्धा दि. 14 ते 30 ऑगस्टदरम्यान (Belgium, the Netherlands) बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये होणार आहे. भारताने आतापर्यंत फक्त एकदाच 1975 मध्ये (Kuala Lumpur World Cup Hockey Tournament) क्वालालंपूर विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकलेली आहे.
