आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेसचा बहुप्रतिक्षित “अँथे-२०२४” शिष्यवृत्ती कार्यक्रम दाखल
पाच उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे असणाऱ्या केनेडी स्पेस सेंटरच्या पाच दिवसांची सहल मोफत
By assal solapuri ।।
सोलापूर : आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने “आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम” या आपल्या प्रमुख शिष्यवृत्ती परीक्षेची १५ गौरवशाली वर्षे पूर्ण केली असून,या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची घोषणा केली आहे. ही लोकप्रिय आणि सर्वाधिक मागणी असलेली परीक्षा इयत्ता सातवी-बारावीच्या विद्यार्थ्यांना रोख पुरस्कारांसह शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी देते आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीमधील त्यांच्या यशस्वी करिअरची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करते. यावर्षी यात एक वैशिष्ट्यपूर्ण बक्षीसाचाही समावेश करण्यात आला आहे. या परीक्षेतील पाच उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे असणाऱ्या केनेडी स्पेस सेंटरच्या पाच दिवसांची सहल मोफत मिळणार आहे.फ्लोरिडा येथे असलेले जॉन एफ. केनेडी स्पेस सेंटर हे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिन्सट्रेशनच्या (नासा) अमेरिकेतील दहा फील्ड केंद्रांपैकी एक आहे.
ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आकाशच्या विस्तृत कोचिंग प्रोग्रामचा फायदा होईल. याद्वारे विद्यार्थ्यांना नीट,जेईई,राज्य सीईटीसह एनटीएसई,ऑलिम्पियाड यांसारख्या विविध शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते. या पत्रकार परिषदेस ब्रॅन्च हेड राहुल बोद्दुल,अकॅडमिक हेड मेडिकल सुनिल राऊत आणि अकॅडमिक हेड विष्णुकुमार महावर उपस्थित होते.
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लि.चे सीईओ आणि एमडी दीपक मेहरोत्रा म्हणाले,“असंख्य विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि क्षमतांमधील अंतर भरून काढण्यात आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झामने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.या शिष्यवृत्ती उपक्रमाने यशस्वी १५ वर्षे पूर्ण केली असून,आम्ही आमचे अभ्यासक्रम देशभरातील विद्यार्थ्यांना प्रवेशयोग्य बनवण्यासाठी तयार केले आहेत.आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम विद्यार्थ्यांना नीट आणि आयआयटी-जेईई परीक्षांची तयारी त्यांच्या स्वत:च्या गतीने करण्यास सक्षम करते.ते घरबसल्याही तयारी करू शकतात.नोंदणी खुली असून विद्यार्थी किंवा पालक anthe.aakash.ac.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात किंवा त्यांच्या शहरातील आकाशच्या जवळच्या केंद्राला भेट देऊ शकतात,असंही दीपक सिक्रोरिया यांनी शेवटी सांगितले.