
सोलापूर : प्रतिनिधी
मेडिकल आणि इंजिनिअरींग क्षेत्रात करिअरचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अभ्यासाचा मार्ग सुकर करण्यासाठी आकाश बायजुसने सोलापुरात पदार्पण केले आहे. मुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मेडिकल आणि इंजिनिअरींगच्या तयारीसाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही. पूर्ण प्रशिक्षित मार्गदर्शक एमएचटी-सीइटीच्या चाचणी पूर्व तयारीकरिता मेडिकल आणि इंजिनिअरींग क्षेत्रात पदार्पण करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे, असे मत आकाश बायजुसचे सीबीएच मृत्युंजय सिंह आणि डेप्युटी डायरेक्टर सुरेश सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आकाश बायजुस तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक चाचणी पूर्व तयारी सेवा प्रदान करते. वैद्यकीय (नीट) आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा (जेईई), शाळा/बोर्ड आणि ऑलिम्पियाड्स सारख्या स्पर्धात्मक परिक्षा “आकाश” ब्रँडशी संबंधीत आहे. जेईई/अभियांत्रिकी प्रवेश परिक्षा, शिष्यवृत्ती परिक्षा, चाचणी पूर्व तयारी उद्योगात 34 वर्षाहून अधिक ऑपरेशनल अनुभव कंपनीकडे आहे. मेडिकलमध्ये मोठ्या संख्येने 325 आकाश केंद्रांचे संपूर्ण भारत नेटवर्क (यासह फ्रॅंचाईजी) आणि वार्षिक विद्यार्थी संख्या 3 लाख 30 हजार पेक्षा अधिक असल्याचे सीबीएच मृत्युंजय सिंह आणि डेप्युटी डायरेक्टर सुरेश सिंह यांनी यावेळी सांगितले.
कालपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय (नीट), अभियांत्रिकी प्रवेश परिक्षा(जेईई) परिक्षा चाचणी पूर्व तयारीसाठी अन्य जिल्ह्यात वा प्रगत शहरात जावे लागत होते. त्यामुळे त्यांच्या पालकांवरील आर्थिक भार वाढत होता. त्या तुलनेत या सर्व गोष्टी स्थानिक ठिकाणी उपलब्ध झाल्या असून आपल्या जिल्ह्याचा ‘पॅटर्न’ म्हणून ख्याती आकाश बायजुस निर्माण करण्यात यशस्वी होईल, असा विश्वासही डेप्युटी डायरेक्टर सुरेश सिंह यांनी व्यक्त केला.
‘विद्यार्थी प्रथम’ दृष्टीकोनासह, त्यांच्यातील अंतर कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रादेशिक आणि मुख्य प्रवाहातील विद्यार्थी अभियांत्रिकीच्या मोठ्या टक्केवारीपर्यंत पोहोचविण्याचे आमचे ध्येय आहे. सीईटी कोर्सद्वारे विद्यार्थी आणि त्यांना एम. एच. टी. सी. इ. टी. साठी पूर्णतः तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यात उच्च प्रशिक्षित तज्ञ या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी दर्जेदार मार्गदर्शन करतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेस सीबीएच मृत्युंजय सिंह, डेप्युटी डायरेक्टर सुरेश सिंग, असिस्टंट डायरेक्टर दीपक सिक्युरिया आणि ब्रँच हेड राहुल बोध्दुल उपस्थित होते.