सेलिब्रेशन, आयएमएस, केएलई, सोशलच्या संघांना विजेतेपद : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
जिल्हास्तरीय १४ व १७ वर्षाखालील आंतरशालेय मुला-मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धा
By assal solapuri||
सोलापूर : जिल्हास्तरीय १४ व १७ वर्षाखालील आंतरशालेय मुला-मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेत सेलिब्रेशन स्पोर्ट्स अकॅडमी,आयएमएस,केएलई,सोशल इंग्लिश स्कूलच्या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांवर मात करीत विजेतेपद पटकावले.
उपमुख्यमंत्री अजितदादा आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह अंतर्गत जिल्हास्तरीय १४ व १७ वर्षाखालील आंतरशालेय मुला-मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि विद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बक्षीस वितरण समारंभ पुंजाल क्रीडांगणावरील एसएसआयच्या बास्केटबाल मैदानावर मंगळवार, दि.२३ जुलै रोजी आयोजित केले होते. जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान, एम. शफी, राजेंद्र नारायकर, खुदुदुस शेख, अहमद महसूलदार, रमीज कारभारी, सोमनाथ शिंदे, सरफराज बागवान, अब्दुल्ला चौधरी, बाळू गायकवाड, ताबिश दौलताबादकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेतील विजेता व उपविजेता मुला-मुलीच्या संघाला बक्षिस देण्यात आले.
बास्केटबॉल स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
1) १७ वर्षाखालील मुलीचा विजेता संघ: सेलिब्रेशन स्पोर्ट्स अकॅडमी उपविजेतेपद संघ: पद्मनगर अकॅडमी
2) १४ वर्षांखालील मुलीचा विजेता संघ: आयएमएस उपविजेतेपद संघ:सुयश गुरुकुल
3) १४ वर्षांखालील मुलाचा विजेता संघ : केएलई उपविजेता संघ:आयएमएस
४) १७ वर्षांखालील मुलाचा विजेता संघ: सोशल इंग्लिश स्कूल उपविजेता संघ: केएलई