खरिप हंगाममध्ये बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी १०० टक्के अनुदान
By assal solapuri ।।
सोलापूर : कापूस, सोयाबीन व इतर तेल बिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेल बिया पिकातील मूल्य साखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेल बिया उत्पादकता वाढवमूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन२०२२-२३ते२०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. सन २०२४-२५ मध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी सॊयाबीन या पिकाकरीता सदर यॊजना लक्षांक प्राप्त आहे. प्रस्तुत योजनेंतर्गत चालू खरिप हंगाममध्ये बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप १०० टक्के अनुदानावर पुरवठा करण्याकरीता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. ३० जुलै २०२४ पासून सदर बाबीच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. कृषी यांत्रीकीकरण या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येईल.
मागील खरीप हंगामातील सॊयाबीन पेरणी क्षेत्रानुसर जिल्हयातील तालुका उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मॊहॊळ, व बार्शी तालुक्यांना लक्षांक वितरीत करण्यात आलेला असून, फ़क्त सदर तालुक्यातील सॊयाबीन उत्पादक शेतक-यांनाच सदर यॊजना लागु आहे.
तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत.व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
