बालसंगोपन, नवमतदार आदी विविध योजनांचा 685 नागरिकांना लाभ

– माजी नगरसेवक प्रा. नारायण बनसोडे यांची माहिती

फोटो : विविध योजनांच्या मेळावा उद्घाटनप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, प्रा. नारायण बनसोडे आदी.

सोलापूर : प्रतिनिधी

प्रभाग 2 येथे विविध योजनांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात प्रधानमंत्री स्वनिधी योजना, बालसंगोपन योजना, नवमतदार नोंदणी अशा विविध योजनांचा 685 नागरिकांनी लाभ घेतला, अशी माहिती माजी नगरसेवक प्रा. नारायण बनसोडे यांनी दिली.

मित्र नगर येथे या विविध योजना मेळाव्याचे उद्घाटन माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख आणि भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी आमदार देशमुख म्हणाले, येथील नागारिकांना पायाभूत सुविधा देण्याबरोबरच त्यांना विविध योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी प्रा. नारायण बनसोडे तत्पर असतात. त्यामुळे प्रा. बनसोडे यांच्या पाठीशी येथील नागरिकांनी उभे राहावे.

भाजपचे नूतन शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, आम्ही प्रभाग 2 मधील विकासकामात आणि जनतेच्या हितासाठी तत्पर आहोत. आम्ही कायम नगरसेवकांच्या पाठीशी आहोत.

यावेळी माजी नगरसेवक डॉ. किरण देशमुख, माजी सभागृह नेता संजय कोळी, शहर उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील, माजी नगरसेवक प्रा. नारायण बनसोडे, चंद्रकांत रमणशेट्टी, कल्पना कारभारी, शालन शिंदे, बसवराज इटकळे, सोमनाथ रगबले, सतीश महाले, राजकुमार रोडगीकर, प्रकाश हत्ती, धोंडप्पा वग्गे, गुड्डू निर्मळ, प्रेम भोगडे, राजेंद्र कुलकर्णी, राहुल शाबादे, प्रथमेश आनंदकर, सर्व बूथप्रमुख आणि लाभार्थी नागरिक उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *