दलित वस्तीमधील स्वच्छतागृहाचा निधी परत न दिल्यास आमरण चक्री उपोषण करणार – माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांचा इशारा

The Dalits of the slum clean house will go on a fast to death cycle
आनंद चंदनशिवे

सोलापूर : प्रतिनिधी

येथील बुधवार पेठेतील विविध ठिकाणी स्वच्छतागृहासाठी महापालिकेचे माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात निधी मंजुर झाला होता परंतु सदरचा निधी स्मार्ट सिटीकडे वळवण्यात आला आहे. तरी सदरचा निधी लवकरात लवकर परत द्यावा, अन्यथा येत्या मंगळवार पासून महापालिकेच्या प्रवेशव्दारावर आमरण चक्री उपोषण करणार असल्याचा इशारा माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे.

सो. म. पा. माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या पुढाकारातून बुधवार पेठ परिसरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगरातील प्लॉट नंबर १७ व १८ दलित वस्ती भागामध्ये धोकादायक झालेल्या सार्वजनिक स्वच्छतागृह नव्याने बांधण्यासाठी गेल्या ३ ते ४ वर्षापासून पाठपुरावा करीत होते. १४ व्या वित्त आयोग अंतर्गत सो. म. पा. प्रभाग क्र. ५ मधील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर बुधवार पेठ प्लॉट नं.१७ मातंग वस्तीमध्ये सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी श्री/मे. अर्ष कन्स्ट्रक्शन प्रो. प्रा. अब्बास कोसगीकर. राहणार शाही विहार, कुमठा नाका, सोलापूर यांना 26 ऑक्टोबर 2021 रोजी म.न.पा. कडून वर्कऑर्डर दिली आहे. याची इस्टिमेट रक्कम 34 लाख 31 हजार 229 रूपये असून टेंडर रक्कम 27 लाख 85 हजार 89 रूपये इतकी आहे. तसेच सो.म.पा. प्रभाग क्रमांक. ५  मधील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर बुधवार पेठ येथील प्लॉट नं. १८ साठे चाळमध्ये सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी श्री. मे. महालिंगेश्वर कन्स्ट्रक्शन प्रो. प्रा. श्री. अंबादास शिंदे यांना 18 नोव्हेंबर 2022 रोजी म.न.पा. कडून वर्क ऑर्डर दिली आहे. त्याची इस्टिमेट रक्कम 32 लाख 35 हजार 695 रूपये इतकी असून टेंडर रक्कम 26 लाख 26 हजार 376 रूपये इतकी आहे. त्याचीही वर्क ऑर्डर देण्यात आली होती. परंतु स्वच्छतागृहाचा निधी स्मार्ट सिटीकडे वळविण्यात आला असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या स्लॅबमधून पाणी गळत आहे. नादुरुस्त झालेले स्लॅब कधीही पडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तरी दलित वस्तीमधील स्वच्छतागृहाचा स्मार्टसिटीकडे वळविण्यात आलेला निधी तातडीने सोमवारपर्यंत न आल्यास मंगळवार पासून महापालिकेच्या प्रवेशव्दारावर आमरण चक्री उपोषण करणार असल्याचा इशारा महानगरपालिकेचे माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

Spread the love

2 thoughts on “दलित वस्तीमधील स्वच्छतागृहाचा निधी परत न दिल्यास आमरण चक्री उपोषण करणार – माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *