
सोलापूर : प्रतिनिधीये
थील जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) मनीषा आव्हाळे यांनी शनिवारी सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून पदभार स्वीकारला.
शुक्रवारी राज्यातील 41 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये सोलापूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती झाली.
पदभार देण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिलीप स्वामी यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना खुर्चीवर बसवले. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकांदे यांनीही त्यांचे स्वागत केले.
थेट IAS असणाऱ्या सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे या जुलै 2021 मध्ये सोलापूर जिल्ह्यात परिविक्षाधीन अधिकारी म्हणून आदिवासी विकास विभागात रुजू झाल्या होत्या. त्यानंतर त्या सोलापूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. आव्हाळे यांनी यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे मसुरीला ट्रेनिंगसाठी गेले असता प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद सांभाळले आहे.