– लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिना निमित्त आयोजन

सोलापूर : प्रतिनिधी
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिना निमित्त पी. बी. ग्रुपच्यावतीने विविध ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये या महाआरोग्य शिबिराचा लाभ जवळपास अडीच हजार जणांनी घेतला असल्याची माहिती माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी दिली.
महाआरोग्य शिबिराच्या सुरवातीला सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप, पुराणिक हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सचिन पुराणिक यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संततधार पावसात देखील महाआरोग्य शिबिरास जवळपास अडीच हजार नागरिकांनी आपली तपासणी करून औषधोपचार घेतले. 18 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर, बुधवार पेठ, महादेव मंदिर, साठे चाळ, पांढरे वस्ती, जुना कारंबा रोड, जय मल्हार नगर, बाळे आदी ठिकाणी महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरास डॉ. सचिन पुराणिक हॉस्पिटल, बलदवा हॉस्पिटल, सिद्धार्थ हॉस्पिटल, डॉ. चिडगुपकर हॉस्पिटल, श्री. मार्कंडेय सोलापूर सहकार्य रुग्णालय, नवनीत तोष्णीवाल नेत्रपेढी, श्री. सिद्धेश्वर मल्टीपर्पज हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले. शिबिरासाठी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या महाआरोग्य शिबिरासाठी संबंधीत सर्व हॉस्पिटलकडून अद्यावत औषधे उपलब्ध करून देण्यात आली होती.
या महाआरोग्य शिबिरास डॉ. सचिन पुराणिक हॉस्पिटलचे डॉ. सागर आरकिले, डॉ. आकाश शेळे, डॉ. प्रगती चव्हाण, डॉ. भाग्यश्री पवार, श्री. मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे डॉ. राजाराम पुल्ली, डॉ. भीमण्णा बद्देली, डॉ. प्रियंका वाघदरे, डॉ. कस्तुरी कोनापुरे, डॉ. ओंकार कलशेट्टी, ईरण्णा पसलादी, रमेश दासपत्ती, पांडुरंग रच्चा, डॉ. नवनीत तोष्णीवाल नेत्रपेढीचे डॉ. नवनीत तोष्णीवाल, डॉ. बाळू राजशंकर, डॉ. बाबर, श्री. सिद्धेश्वर मल्टीपर्पज हॉस्पिटलचे डॉ. सुदर्शन चव्हाण, सिस्टर अक्षराबाई कसबे, मयुरी गायकवाड आदींचे सहकार्य लाभले.
यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी, महानगरपालिकेचे मुख्य सफाई अधीक्षक बिराजदार , विभागीय कार्यालय क्रमांक १ चे विभागीय अधिकारी नंदकुमार गजदाने , नागेश मेंडगुळे, आरोग्य निरीक्षक जितू मोरे, विजय साळुंखे, धीरज वाघमोडे, प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी. बी. ग्रुप) चे अध्यक्ष अमित बनसोडे, कार्याध्यक्ष आदित्य चंदनशिवे, सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत जाधव, भारत बाबरे, प्रताप वाघमारे, चंद्रकांत सोनवणे, श्रीनिवास येनगंदूल, सिद्धांत सुर्वे, पी. बी. ग्रुप उपाध्यक्ष श्रीकांत वाघमोडे, श्रावण सरवदे, रवी सकट, रंगा वाघमारे आदी उपस्थित होते.
Исследуйте воздушное пространство в игре Авиатор
2. Превратитесь в настоящего авиатора в игре Авиатор
3. Наслаждайтесь приключениями в игре Авиатор
4. Станьте легендарным пилотом в игре Авиатор
5. Детальное исследование вселенной игры Авиатор
6. Получите новые жизненные ощущения в игре Авиатор
7. Знакомьтесь с удивительным миром игры Авиатор
8. Станьте разведчиком в игре Авиатор
9. Откройте для себя новые земли в игре Авиатор
Победитель в Авиаторе получит все!