School lawn tennis tournament: शनाया हिरेमठची विभागीय स्तरावर निवड

U-14  : मुलींच्या वयोगटात पाचवा क्रमांक

अस्सल सोलापुरी ||

School lawn tennis tournament  : शहरस्तरीय आंतरशालेय लॉन टेनिस स्पर्धेत (INDIAN MODEL INTERNATIONAL SHOOL) इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलच्या (SHANAYA HIREMATH) शनाया हिरेमठने  (U-14) 14 वर्षांखालील मुलींच्या वयोगटात पाचवा क्रमांक पटकविला.  या कामगिरीवरून तिची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

शनाया हिरेमठ

(Office of the District Sports Officer) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व (Solapur Municipal Corporation) सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल कुमठा नाका येथे या स्पर्धा पार पडल्या. तिला (SPORTS TEACHER) क्रीडाशिक्षक अजय चाबुकस्वार यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल तिचे संस्थापक अध्यक्ष ए. डी. जोशी, सचिव अमोल जोशी, श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी, ममता बसवंती, मुख्याध्यापिका मानसी जोशी यांनी अभिनंदन केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *