बँक ऑफ इंडियाचा १२० वा वर्धापनदिन; संभव फाऊंडेशनचा कर्तव्य निधीने सन्मान
Bank of India’s 120th anniversary; Sambhav Foundation honoured with Duties Fund

अस्सल सोलापुरी ||
Sambhav Foundation honoured : सोलापूर : सामाजिक बांधिलकी जोपासत सोलापूर शहरात कार्यरत बेवारस मनोरुग्णांसाठी अविरत कार्य करणारे संभव फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण सिरसट यांचा बँक ऑफ इंडियाच्यावतीने सन्मान करण्यात आला. सोलापूर झोनचे झोनल मॅनेजर चंद्रशेखर मंत्री यांच्या हस्ते व चीफ मॅनेजर श्रवण कुमार यांच्या प्रमुख उपस्थिती सन्मानपत्र व कर्तव्य निधी देऊन सन्मानित करण्यात आले.
संभव फाऊंडेशन ही संस्था बेवारस मनोरुग्णांसाठी कार्यरत आहे. आजपर्यंत तीनशेहून अधिक मनोरुग्णांचे कौटुंबिक पुनर्वसन ((Family rehabilitation of the mentally illness) )संभव फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे. संभव फाऊंडेशनच्या माध्यमातून संभव शैक्षणिक प्रकल्प, संभव अन्नपूर्णा योजनाच्या माध्यमातून निराधारांना शहरात अन्नदानाचे कार्य संस्था करीत असते.

याप्रसंगी वयोवृद्ध पेन्शनर्स यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक अभय सुराणा, कांसवा टेक्स्टाईल्सचे मालक तिलोकचंद शाह, कस्तुरे एजन्सीचे मालक मंगेश कस्तुरे यांनी आपल्या तीन पिढ्यांपासून नात्याला उजाळा दिला. बँकेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उत्कृष्ट ग्राहक सेवेला प्रोत्साहित करण्यासाठी भारद्वाज नायक, वसुली अधिकारी, सुमन मामोरिया, कस्टमर सर्व्हिस असोसिएट यांचा झोनल मॅनेजर चंद्रशेखर मंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन अर्जुन कोणतंम, बोधिसत्व गाडे, रवी गुंजोटीकर यांच्या नियोजनाखाली झाले. सूत्रसंचालन नितीन वाघमोडे यांनी केले.