मैदानी स्पर्धा: भक्ती थोरात, फराज शेख, पवन धोत्रे, सुमीत माने, स्वरा जाधव दुहेरी विजेतेपदाचे मानकरी
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : एस.आर.पी.एफ. ग्रुप नंबर दहाच्या ३८ व्या गटांतर्गत आयोजीत मैदानी स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील मुलींमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस.आर.पी. कॅम्प (गट शाळा) मधील खेळाडू पवित्रा नागलगाव ही सर्वात वेगवान धावपट्टूची मानकरी ठरली. विविध मैदानी स्पर्धेत विविध वयोगटातून भक्ती थोरात, फराज शेख, पवन धोत्रे, सुमीत माने, स्वरा जाधव हे दुहेरी विजेतेपदाचे मानकरी ठरले.
सोलापूर शहर व जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने एस.आर.पी.एफ. मैदान येथे आयोजीत या स्पर्धेचे उद्घाटन माजी राष्ट्रीय खेळाडू जीवनदास इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रा. राजू प्याटी, सुरेश भोसले, दशरथ गुरव, चेतन धनवडे, सुर्याजी लिंगडे, प्रकाश गायकवाड, आब्बा नवले, शिवानंद मैंदर्गी, रवी राठोड, संजय सावंत, श्रीधर देशमुख, एकनाथ पवार, तानाजी राठोड, विक्रम पवार, दीपक कासे, सुनिल जाधव, एस.आर.पी. एफ. पोलीस हवालदार दयानंद जाधव, किरण गायकवाड, नागणे, भारती लिंगडे, विजयालक्ष्मी प्याटी आदी उपस्थित होते.
एस आर पी एफ ग्रुप नंबर दहाचे समादेशक डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली समादेशक सहाय्यक मते यांच्या नियोजनाखाली साळुंखे, तांगडे यांच्या सहकार्याने एस.आर.पी.एफ.ग्रुप नंबर दहाच्या 38 व्या गटांतर्गत या स्पर्धा पार पडल्या.

या अंतर्गत 14 वर्षांखालील मुला-मुलींची 60 मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मुलींच्या गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस.आर.पी.कॅम्प (गट शाळा) सोलापूर येथील विद्यार्थिनी पवित्रा नागलगाव हिने प्रथम क्रमांक मिळवून वेगवान धावपटूचा सन्मान मिळविला. द्वितीय क्रमांक अक्षता गंगोंडा तर तृतीय क्रमांक सृष्टी हडपद (इयत्ता 7 वी) या विद्यार्थिनींनी पटकावला. मुलांच्या गटात प्रथम क्रमांक इम्तियाज पटेल, द्वितीय क्रमांक अथर्व अनिल गोबे (गट शाळा) तर तृतीय क्रमांक रुद्र कुंभार याने पटकवला. विजेत्यांचा समादेशक डॉ.दिपाली काळे यांच्या हस्ते मेडल देऊन सत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रियांका माळी, मुख्याध्यापक पुंडलिक कलखांबकर, बाळासाहेब खताळ, श्रीशैल समदुर्ले, सारिका राठोड, कृपा राठोड, राजश्री करकंटी, कल्पना बिराजदार, श्वेता उंबरजे, सोनाली भोसले, भाग्यश्री कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुरज टोणपे आदींनी अभिनंदन केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :…
-
16 वर्षे मुले (60 मीटर धावणे ) प्रथम : वसंत वाघमारे (विराट स्पोर्ट्स), द्वितीय अनिकेत कलमदाने (ब्रह्मा स्पोर्ट्स कुमठे), तृतीय सिद्धम बोगा (सेंट जोसेफ हायस्कूल ).
-
80 मीटर अडथळा शर्यत प्रथम : यश लिंगडे (विरार स्पोर्ट्स), द्वितीय सुरज रणपिसे (अजिंक्यतारा स्पोर्ट्स पंढरपूर), तृतीय समीर व्हट्टे (अजिंक्यतारा स्पोर्ट्स, पंढरपूर).
-
600 मीटर धावणे प्रथम : प्रथमेश वाघमोडे (अजिंक्यतारा स्पोर्ट्स पंढरपूर), द्वितीय रविराज नरळे (बालाजी नगर), तृतीय कार्तिक साळुंखे (अजिंक्यतारा स्पोर्ट्स, पंढरपूर).
-
लांब उडी प्रथम : युवराज निंबाळकर (अजिंक्यतारा स्पोर्ट्स, पंढरपूर), द्वितीय भूषण हुबळीकर (स्पिंट किंग स्पोर्ट्स, बार्शी) तृतीय समीर व्हट्टे (अजिंक्यतारा स्पोर्ट्स, पंढरपूर).
-
गोळा फेक : प्रथम श्रेयस शिंदे (अजिंक्यतारा स्पोर्ट्स, पंढरपूर) द्वितीय अथर्व चौगुले (हरिभाई देवकरण प्रशाला) तृतीय नागेश काशी (प्रार्थना अकॅडमी नेहरूनगर, सोलापूर)
-
भाला फेक : प्रथम सुयोग यादव (जिजाऊ गुरुकुल खांडवी, बार्शी), तृतीय तनवीर सय्यद (आदर्श हायस्कूल, कुर्डूवाडी).
-
16 वर्षे मुली 60 मीटर धावणे : प्रथम आरोही पार्टनर्स (बॅटन स्पोर्ट्स, हिप्परगे), द्वितीय खुशी पवार (सोलापूर), तृतीय श्रद्धा सर्वोदय (सोलापूर).
-
80 मीटर अडथळा शर्यत : भक्ती थोरात (विराट स्पोर्ट्स, सोलापूर), द्वितीय साक्षी दोषी (करमाळा).
-
600 मीटर धावणे : प्रथम आर्ची पार्टनर्स (बॅटन स्पोर्ट्स, हिप्परगा), द्वितीय अक्षरा पवार (बालाजी नगर, मंगळवेढा), तृतीय अनुश्री माशा (अजिंक्य स्पोर्ट्स, पंढरपूर)
-
लांब उडी : प्रथम भक्ती थोरात (विराट स्पोर्ट्स), द्वितीय तृप्ती घोलप (अजिंक्य स्पोर्ट्स, पंढरपूर), तृतीय खुशी पवार (अनुलक्ष अकॅडमी).
-
गोळा फेक : प्रथम साक्षी अरकीले (गुरु क्लब, करमाळा), द्वितीय अनुजा पांढरे (विराट स्पोर्ट्स), तृतीय सोनाक्षी राठोड (ब्रह्मा स्पोर्ट्स, कुमठे).
-
भाला फेक : प्रथम आर्या दशरथ (शंकरराव मोहिते-पाटील प्रशाला, अकलूज), द्वितीय जानवी पालवे (गुरु क्रीडा क्लब), तृतीय सुप्रिया कोळी (स्वामी विवेकानंद प्रशाला, एमआयडीसी, सोलापूर).

-
18 वर्षे मुले : 100 मीटर धावणे: प्रथम सार्थ सपकाळ (व्ही.व्ही.पी. कॉलेज), द्वितीय वैभव चव्हाण (माळशिरस), तृतीय हर्ष राजूरकर (अकलूज).
-
200 मीटर धावणे : प्रथम फराज शेख (विरार स्पोर्ट्स, नेहरूनगर), द्वितीय सार्थ लोंढे, (माढा), तृतीय रोहित मोहोळ.
-
400 मीटर धावणे : प्रथम फराज शेख (विराट स्पोर्ट्स), द्वितीय ऋषिकेश कोरे (माढा).
-
1000 मीटर धावणे : प्रथम ऋषिकेश चव्हाण (सांगोला), द्वितीय आप्पा म्हेत्रे (सोलापूर), तृतीय पृथ्वीराज राठोड (सोलापूर).
-
110 मीटर अडथळा शर्यत : प्रथम अथर्व शिर्के (अकलूज), द्वितीय प्रवीण खुळे (अकलूज), तृतीय किरण जाधव (बार्शी) .
-
लांब उडी : प्रथम संजय गायकवाड (अजिंक्यतारा स्पोर्ट्स पंढरपर), द्वितीय वेदांत लावंड (माळीनगर), तृतीय संकेत माने (एस.डी.आर. अकॅडमी, सांगोला).
-
गोळा फेक : प्रथम पवन धोत्रे (अजिंक्यतारा स्पोर्ट्स, पंढरपूर) द्वितीय शिवराज लोंढे (आदर्श जुनियर कॉलेज, कुर्डूवाडी), तृतीय यशराज शिंदे (नागनाथ ज्युनियर कॉलेज मोहोळ).
-
भाला फेक : प्रथम पवन धोत्रे (अजिंक्यतारा स्पोर्टस), द्वितीय शुभम पाटील (सोलापूर), तृतीय राहुल बोलाबत्ती (स्वामी विवेकानंद प्रशाला, एमआयडीसी सोलापूर)
-
थाळी फेक : प्रथम शिवराज बोंडे (आदर्श जुनियर कॉलेज, (कुर्डूवाडी) द्वितीय गुरु गायकवाड (नागनाथ ज्युनिअर कॉलेज, मोहोळ), तृतीय प्रांजल सोनटक्के (नागनाथ जुनियर कॉलेज, मोहोळ).
-
5 किमी पायी चालणे: प्रथम वैभव चव्हाण (अकलूज).
-
18 वर्षे मुली 100 धावणे : प्रथम आदिती सपकाळ (सोलापूर), द्वितीय मानसी महाडिक (सोलापूर), तृतीय कुमारी गवळी (सोलापूर).
-
200 मीटर धावणे : प्रथम स्वरा जाधव (विराट स्पोर्ट्स), द्वितीय आदिती सपकाळ (सोलापूर), तृतीय मानसी महाडिक(सोलापूर).
-
400 मीटर धावणे : प्रथम स्वरा जाधव (विराट स्पोर्ट्स), द्वितीय अस्मिता काळे (सोलापूर), तृतीय आर्या शितोळे(विराट स्पोर्ट्स).
-
1000 मीटर धावणे : प्रथम सारिका आयवळे (अजिंक्यतारा स्पोर्ट्स, पंढरपूर), द्वितीय अर्पिता पवार (सोलापूर) सुभाषी मैंदर्गी (पोलीस हेडकॉटर क्लब, सोलापूर)
-
3 किमी पायी चालणे : प्रथम अनुराधा कारंडे (जरा चंडक प्रशाला बाळे), द्वितीय अस्मिता पवार (ब्रह्मा स्पोर्ट्स कुमठे), तृतीय श्रावणी मासा (ज.रा. चंडक प्रशाला, बाळे).
-
गोळा फेक : प्रथम सृष्टी गंगणे (एस.व्ही.सी.एस.प्रशाला, भवानी पेठ), द्वितीय शरण्या सुतार (अजिंक्यतारा स्पोर्ट्स, पंढरपूर), तृतीय : वैभवी धोत्रे (स्वामी समर्थ अकॅडमी).
-
थाळी फेक : प्रथम वैष्णवी भोसले (अजिंक्यतारा स्पोर्ट्स, पंढरपूर), द्वितीय श्रीदेवी शिंदे (नरसिंह विद्यालय, पाकणी).
-
भाला फेक : प्रथम वैष्णवी ढेकळे (शंकरराव मोहिते-पाटील विद्यालय, अकलूज).
-
20 वर्षे वयोगट मुले : 100 मीटर धावणे : प्रथम यश साळुंखे (सोलापूर), द्वितीय निलेश कांबळे (मोहोळ), तृतीय केशव नाईकनवरे (माळशिरस).
-
200 मीटर धावणे : प्रथम ओम वरवंडकर (विराट स्पोर्ट्स), द्वितीय निलेश कांबळे (मोहोळ), तृतीय सचिन मायनाळे (विराट स्पोर्ट्स).
-
400 मीटर धावणे : प्रथम मोरवडकर (विरार स्पोर्ट्स), द्वितीय आदित्य शिंदे (अजिंक्यतारा स्पोर्ट्स), तृतीय प्रथमेश मुळीक (सोलापूर).
-
800 मीटर धावणे : प्रथम प्रथमेश मुळीक (सोलापूर), द्वितीय सदानंद चव्हाण (सोलापूर).
-
1500 मीटर धावणे : प्रथम सचिन बोदगिरे (सोलापूर), द्वितीय अनिकेत पवार (सांगोला), तृतीय वैभव पाटील (संगमेश्वर कॉलेज).
-
3000 मीटर धावणे : प्रथम सुमित माने (अजिंक्य स्पोर्ट्स), द्वितीय पृथ्वीराज पवार (माळशिरस), तृतीय पृथ्वीराज शिंदे (माढा).
-
5000 मीटर धावणे : प्रथम सुमित माने द्वितीय ओंकार लवटे (न्यू इंग्लिश स्कूल, सांगोला), तृतीय प्रणव बनकर (माळीनगर).
-
110 मीटर अडथळा शर्यत : प्रथम मन्मथन जरलिंगे (सोलापूर), द्वितीय यश साळुंखे (सोलापूर), तृतीय पृथ्वीराज गायकवाड (अजिंक्य स्पोर्ट्स, पंढरपूर).
-
लांब उडी : प्रथम सचिन मायनाळे (विराट स्पोर्ट्स), द्वितीय रोहित बाबर (एन.डी.आर. अकॅडमी, सांगोला), तृतीय एस. जमादार (सनराइज् स्पोर्ट्स, टेंभुर्णी).
-
तिहेरी उडी : प्रथम ओंकार घोडके (संगमेश्वर कॉलेज), द्वितीय रोहन राज घाडगे (अजिंक्य स्पोर्ट्स, पंढरपूर).
-
गोळा फेक : प्रथम विश्वराज जमादार (विराट स्पोर्ट्स अकॅडमी), द्वितीय सुदेश ढोबळे (सोलापूर), तृतीय आयन शेख (आय.एम.एस.कासेगाव, पंढरपूर).
-
भाला फेक : प्रथम आदेश गायकवाड (इंग्लिश स्कूल, मंगळवेढा), द्वितीय ओंकार लवटे (न्यू इंग्लिश स्कूल, सांगोला). 20 वर्षे मुली : प्रथम पूजा राठोड (विराट स्पोर्ट्स), द्वितीय आयेशा अरन (बार्शी), तृतीय पल्लवी बंडगर (सोलापूर).
-
200 मीटर धावणे : प्रथम पूजा राठोड (विराट स्पोर्ट्स), द्वितीय कल्याणी सोनकर (सोलापूर).
-
400 मीटर धावणे : प्रथम श्री महागुंडे (बार्शी), द्वितीय पल्लवी बंडगर (सोलापूर), तृतीय मानसी चंदनशिवे (सोलापूर).
-
800 मीटर धावणे : प्रथम गायत्री माशा (अजिंक्य स्पोर्ट्स), द्वितीय श्रावणी मोरे (अजिंक्य स्पोर्ट्स), तृतीय महांता चौगुले (सोलापूर).
-
3000 मीटर : प्रथम कल्याणी जानकर (सोलापूर), द्वितीय अल्फिया खतीब (सोलापूर).
-
5000 धावणे : प्रथम स्वाती माळी (होनसळ).
-
लांब उडी : प्रथम यशश्री गावडे (मनस्वी करिअर अकॅडमी, वडाळा).
-
गोळा फेक : प्रथम सुकन्या जाधव (प्रार्थना अकॅडमी, नेहरूनगर), द्वितीय यशश्री गावडे (मनस्वी करियर अकॅडमी, वडाळा).
