येत्या दि. १२ ऑगस्टपासून दयानंद कॉलेजच्या मैदानावर आयोजन
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : इंदिरा गांधी स्टेडियम येथे दिलीपराव माने चषक १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालं. असोसिएशनचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीप रावजी माने (मालक) यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा आयोजिल्या आहेत. या स्पर्धा अलंकार ट्रेडिंग कंपनीचे मालक राजासाहेब बागवान, डी. एम. क्रिकेट अकॅडमीचे सुनील चव्हाण, एन.जी. क्रिकेट ॲकॅडमीचे निलेश गायकवाड यांनी पुरस्कृत केल्या आहेत.
या स्पर्धेचं उदघाटन सोलापूरचे रणजी खेळाडू व सध्या रणजी क्रिकेट स्पर्धेचे निवड समिती सदस्य रोहित जाधव व नुकतेच आयपीएल स्पर्धेत पंच म्हणून कामगिरी बजावलेले व सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अंपायर कमिटीचे चेअरमन अनिस सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आलं.

याप्रसंगी सुनील मालप, राजेंद्र गोटे, संजय वडजे, उदय डोके, संजय मोरे, राजू रंगम, चिराग शहा, संतोष बडवे, योगेश कोम्पल, सुदर्शन लोखंडे, मल्लिनाथ चौधरी, विनोद पाटील, राहुल म्हेत्रे उपस्थित होते. प्रास्ताविक सुनील चव्हाण, सूत्रसंचालन सुनील मालप यांनी केले. आभार प्रदर्शन विष्णू गायकवाड यांनी केले. या स्पर्धा दि. १२ ऑगस्ट २०२५ पासून दयानंद कॉलेजच्या मैदानावर घेण्याचे नियोजन आहे. या सर्व स्पर्धा सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बर्सू यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा लीग पद्धतीने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे मुलांना जास्तीच जास्त सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. ज्या संघांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा आहे, त्यांनी दि. ऑगस्ट २०२५ पर्यंत शिवा अकलूजकर यांच्याकडे नावे नोंदवावीत.
