क्रीडा संकुलात 400 मीटर सिंथेटिक ट्रॅकचे भूमीजूपन

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर :  जिल्हा क्रीडा संकुल समिती सोलापूर आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका येथे 400 मीटर सिंथेटिक ट्रॅकचे अनावरण व भूमिपूजनाचा  कार्यक्रम पार पडला. या सिंथेटिक ट्रॅक कामाचे भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी क्रीडा उपसंचालक युवराज नाईक (पुणे) यांनी पालकमंत्री गोरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आ. सचिन कल्याण शेट्टी, आ. देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा प्रेमी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नवीन ट्रॅकच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुलात प्रशिक्षण आणि स्पर्धांची सोयीसुविधा अधिक अद्यावत व सर्वसमावेशक होणार आहेत. स्थानिक खेळाडूंसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून, सोलापूरच्या क्रीडा वारसा राज्य, देश व जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने अशा सुविधा उभारल्या जात आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *