शालेय क्रीडा स्पर्धा लवकरात लवकर घेण्यात याव्यात

 

क्रीडा अधिकाऱ्यांचा राजीनामा; शालेय स्पर्धांवर परिणाम होण्याची शक्यता; सर्व वेळापत्रक कोलमडण्याची क्रीडा शिक्षकांना भीती

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : ऐन शालेय क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका क्रीडा अधिकारी भूषण जाधव यांनी अचानकपणे दिलेला राजीनामा आणि जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांचा राजीनामा की स्वेच्छा निवृत्ती? याची अफवा आणि चर्चा,  या सर्व घटनाक्रमांमुळे आगामी शालेय क्रीडा स्पर्धावर गंभीर परिणाम होणार आहे. सर्व वेळापत्रक कोलमडण्याची भीती क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, क्रीडा संघटक, क्रीडा शिक्षक, खेळाडू- पालक यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार
सोमपा क्रीडाधिकारी भूषण जाधव

सोलापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचा कारभार केवळ एक जिल्हा क्रीडाधिकाऱ्यासह तिघांवर सुरु आहे.   त्यामुळे त्यांच्यावर जिल्ह्यातील खेळांचा अतिरिक्त बोजा वाढलेला आहे. एका क्लार्कसह दोन क्रीडा अधिकारी हे सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे कामकाज सुरु आहे. त्यापैकी एकाकडे तालुक्याचे चार्ज आहे. त्यांना शहराचे अतिरिक्त कामकाज पाहावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांवर अधिकचा ताण पडणार आहे.

चालू सन २०२५ या शैक्षणिक वर्षातील क्रीडा स्पर्धेला सुरुवात व्हायला हवे होते. मात्र प्रायमरी फॉर्म भरण्याची तारीख दि. ३१ जुलै असे दिसत आहे. या शालेय क्रीडा स्पर्धासंदर्भात कोणत्याची प्रकारचे शेड्यूल तयार केले गेले नाही. तरीदेखील दि. ३१ जुलै असे तारीख दिसत आहे. त्यामुळे क्रीडा शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था दिसत आहे. दरम्यान, महापालिकेचे क्रीडा अधिकारी भूषण जाधव यांचा राजीनामा आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांचा राजीनामा आणि स्वेच्छा निवृत्तीची चर्चा सुरु आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्राचे भविष्य धोक्यात आहे.क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनावर प्रश्नचिन्ह उभे आहे.

स्पर्धा घेण्याचे नियोजन केले जावे

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत शहरस्तरीय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या आगामी शालेय क्रीडा स्पर्धां लवकरात लवकर घेण्यात याव्यात. आतापर्यंत शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासंदर्भात कोणत्याही प्रकारचे नियोजन झाले नाही. तरी याचे नियोजन लवकर झाले पाहिजे.

-संतोष खेंडे, अध्यक्ष सोलापूर शहर शारीरिक शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघ.

==========================================================================

क्रीडा स्पर्धाबाबत अद्यापही कोणत्याही हालचाली नाहीत

शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनासंदर्भातील बैठक तातडीने घेणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सोलापूर महानगर पालिका क्रीडा कार्यालय यांच्याकडून अद्यापही कोणत्याही प्रकारच्या हालचाली नाहीत. त्यामुळे क्रीडा शिक्षकांमध्ये सध्या संभ्रमाची अवस्था आहे.

सुहास छंचुरे, सचिव सोलापूर शहर शारीरिक शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघ

 

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *