जनकल्याण अन दुःख निवारण्यासाठी जप-तप आवश्यक

काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींचे आशीर्वचन; श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ, एस.एस.साबळे वीरशैव ट्रस्ट यांचा उपक्रम

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : मानव जीवन कल्याण आणि आपले दुःख दूर होण्यासाठी जप-तप करणे आवश्यक आहे, असे आशीर्वचन काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींनी केले. श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ व एस.एस.साबळे वीरशैव ट्रस्ट यांच्यावतीने शिवानुभव मंगल कार्यालय येथे आषाढ मासनिमित्त  शिवमहा पुराण  कथेला सुरुवात झाली आहे. त्यामिमित  काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींचे आशीर्वचन झाले.

 बृह्न्मठ होटगी संस्थानवतीने जगद्गुरू  डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजीनी श्री वीरशैव वैदिक मंडळ संचलित वीरशैव लिंगायत जंगम संस्कार केंद्र भवन बांधकामासाठी वैदिक मंडळांच्या पदाधिकार्यांना पाच लाख रुपये देणगीचा धनादेश प्रदान केला. 

प्रारंभी जगद्गुरू  डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींच्या अमृत हस्ते शिव महापुराण कथा ग्रंथ पूजनाने शिव महापुराण कथेस प्रारंभ झाला. याप्रसंगी अमृतेश्वर शिवाचार्य स्वामीजी (जिंतूर),  श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर संचालक राजशेखर शिवादारे, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी  सुरज मुलाणी, श्री सिद्धेश्वर सहकारी बँकचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, मार्केट यार्ड व्यापारी श्रीशैल अंबारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी चार्टर्ड अकाऊंट अमित लंगोटे व अमित सिंदगी या दांपत्याकडून शिव महापुराण कथा ग्रंथ पूजन करून द्वितीय पुष्प शिव महापुराण कथेस प्रारंभ झाला. यावेळी वेदमुर्ती चिदानंद स्वामी-पुरवंत, शांतेश स्वामी, कार्तिक स्वामी, नागराज मठपती, वैदिक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजीनी शिव महापुराण कथेचे महत्व वारमाप करून घरदार विसरून शिव म पुराण कथेत रममाण होणे कसे महत्वाचे आहे याचे स्पष्टीकरण दिले.  जीवन पावन करून घेण्यासाठी कथेत लीन होणे महत्वाचे आहे.  बारा ज्योतिर्लिंग यात्रा करणे फार कठीण आहे. परंतु अमृतेश्वर शिवाचार्य  स्वामीजी यांच्या अमृतं वाणीने स्वतः त्यात मग्न झाल्यास स्वर्गात जावून आल्याची प्रचिती येते आणि आनंदी जीवन जगण्यासाठी शिव कथा आणि काशी जगद्गुरुंच्या आशीर्वचनाचे. घर-संसार कुठेही जातं नाही पण संसारातील काही वेळ अद्यात्मिक, धार्मिक कार्यात मग्न होणे गरजेचे आहे. बारा जोतिर्लिंग स्तोत्र म्हटल्यावर सर्व ज्योतिर्लिंग  दर्शन  घेतल्याची प्रचिती  बसल्या ठिकाणी घडून येते. त्यासाठी आपल्या इष्ट देवताचे स्त्रोत्र पठण करावे.  मन स्थिर ठेवून, श्रद्देने जप स्त्रोत्र पठण करावे. तसे केल्याने त्या जप स्त्रोत्रप्रमाणे आपल्याला आपण ज्या ठिकाणी बसलेले असतो, त्या ठिकाणी देवी देवतांचे दर्शन घडून येते. म्हणून मानव जीवन कल्याण आणि आपले दुःख दूर होण्यासाठी जप-तप करणे आवश्यक आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *