सोलापूर बार असोसिएशनचा उपक्रम
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : जागतिक न्याय दिनानिमित्त सोलापूर बार असोसिएशन आणि अश्विनी ब्लड सेंटर,कुंभारी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. १७ जुलै २९२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकोपयोगी व समाजउपयोगी कार्यात आपण रक्तदान करून अनेक गरजू रुग्णाचे जीव वाचवू या व समाजापुढे एक आदर्श निर्माण करूया… या उदात्त हेतूने सोलापूर बार असोशिएशनच्या रक्तदान शिबीर भरवण्यात आले आहे.
यासाठी नूतन अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव, ॲड. रियाज शेख, सचिव बसवराज हिंगमिरे,अरविंद देढे,मीरा प्रसाद यांच्यासह सर्व पदाधिकारी व वकील मंडळी परीश्रम घेत आहेत.
