डी. बी देवधर चषक : सदानंद मोहोळ संघाला पहिल्या डावात आघाडी; वसंत रांजणे ईलेव्हन संघाच्या सर्वबाद ३५४ धावा
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित सोलापुरात सुरू असलेल्या डी.बी. देवधर चषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच्या सामन्यात वसंत रांजणे संघाच्या सर्वबाद ३५४ धावा केल्या आहेत. तर सदानंद मोहोळ संघाने पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. हेमंत कानिटकर संघ अद्यापही ८५ धावांनी पिछाडीवर आहे.
वसंत रांजणे ईलेव्हन संघाने ८९.५ षटकात सर्वबाद ३५४ धावा केल्या. यात शमशुझमा काझीने दमदार अर्धशतक झळकावले. सदानंद मोहोळ संघाला पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. महेश मस्केने नाबाद १०३ धावा केल्या. अभिषेक जोशीने ८२ धावांची अर्धशतकीय खेळी केली. या वर्षापासून वरिष्ठ गटाच्या मुलांच्यासाठी नव्याने डी.बी. देवधर चषक स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. मिझान सय्यदने नाबाद तडफदार शतक झळकावले. मंदार भंडारी व ऋषिकेश सोनावणे यांनी संयमी अर्धशतकीय खेळी केली. उबेद खानचे शतक हुकले. मनोज इंगळेने चार तर नदीम शेखने सहा बळी घेतले.
पहिला सामना (इंदिरा गांधी पार्क स्टेडियम):
वसंत रांजणे ईलेव्हन : ८९.५ षटकात सर्वबाद ३५४ धावा. शमशुजमा काझी ५९, ऋषिकेश दौंड ४१, यश खलाडकर २५. हेमंत कानिटकर ईलेव्हन संघ गोलंदाजी: राजवर्धन हंगरगेकर तीन बळी, सुमीत मारकली २ बळी. नचिकेत ठाकूर, सोहन जमाले, क्षितीज पाटील, शिवराज शेळके प्रत्येकी एक बळी. हेमंत कानिटकर ईलेव्हन : ६७ षटकात ५ बाद २६९. महेश मस्के नाबाद १३०, अभिषेक जोशी ८२, संग्राम भालेकर ३५ धावा. वसंत रांजणे ईलेव्हन संघ गोलंदाजी: तनय संघवी ४७ धावात चार बळी, स्वराज चव्हाण ३४ धावात एक बळी. हेमंत कानिटकर संघ अद्यापही ८५ धावांनी पिछाडीवर आहे.
———————————————————————————————————————————————————–
दुसरा सामना : (दयानंद कॉलेज ग्राउंड)
सदानंद मोहोळ ईलेव्हन : सर्वबाद ३२६ धावा. सदू शिंदे ईलेव्हन : सर्वबाद ४३.४ षटकात सर्वबाद २१४ धावा. ऋषिकेश सोनावणे ५५ धावा, उबेद खान ९१ धावा, रवींद्र जाधव २८ धावा.
सदानंद मोहोळ ईलेव्हन गोलंदाजी: नदीम शेख २८ धावात सहा बळी, अभिषेक निषाद ४५ धावात दोन बळी, वैभव गोसावी व योगेश चव्हाण प्रत्येकी एक बळी.
सदानंद मोहोळ ईलेव्हन : ४९ षटकात ५ बाद २३५ धावा. दिग्विजय पाटील ६६ धावा, मेहुल पटेल ८३ धावा, मिजान सय्यद ३० धावा, यश क्षीरसागर २८ धावा. सदू शिंदे ईलेव्हन गोलंदाजी: शुभम माने ४३ धावात दोन बळी, अक्षय वाईकर, निमीर जोशी, प्रशांत सोळंकी प्रत्येकी एक बळी. सदानंद मोहोळ सदू शिंदे ईलेव्हन संघाने ३४७ धावांची आघाडी घेतली आहे.
