आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी जून २०२५ अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र दि. ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन सादर करावेत

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क||

सोलापूर  :  सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक/खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी जून २०२५ अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र दि. ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसूचीत करणेची सक्ती करणारा) कायदा १९५९ व त्याखालील नियमावली १८६०  मधील कलम ५ (१) (शासकीय आस्थापनांसाठी), ५ (२) (खाजगी आस्थापनांसाठी) नुसार, सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक/खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांचेकडे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती पुरुष/स्त्री/एकूण (त्रैमासिक विवरणपत्र ई.आर-१) स्थानिक सेवायोजन कार्यालयास ऑनलाईन सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे.

या सेवायोजन क्षेत्र माहितीचा उपयोग हा योजनाबध्द आर्थिक विकासात निरनिराळे प्रकल्प तयार करण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी, आवश्यक मनुष्यबळाचा अंदाज घेण्यासाठी होत असतो. अशा प्रकारची प्राप्त होणारी सांख्यिकी माहिती महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालय, नवी दिल्ली यांचे कडे दर तिमाहीस पाठविली जाते.

तरी सदर त्रैमासिक विवरणपत्र (ई.आर-१) दि. ३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे. या वेबपोर्टलवर त्रैमासिक विवरणपत्र ई. आर-१ हे प्रत्येक तिमाही संपल्यानंतर ऑनलाईन सादर करण्यासाठी प्रत्येक आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड हे यापूर्वीच दिलेले आहेत, त्याचा वापर करून भरण्यात यावा.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्कचौक, सोलापूर (०२१७-२९९२९५६) या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

त्रैमासिक विवरणपत्र (ईआर-१) ऑनलाईन भरण्याची पध्दत खालीलप्रमाणे:

  • सर्व प्रथम आपल्या संगणकाच्या बाऊजरमाणे https://rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळ ओपन करावे. या संकेतस्थळावर नियोक्ता (नोकरी सूची) एम्प्लॉयर (लिस्ट अ जॉब) हा पर्याय निवडावा. स्क्रिनवर दिसणा-या नियोक्ता लॉग-इन (एम्प्लॉयर लॉगीन) या विओमध्ये आस्थापनेच्या गुजरआयडी/रजिस्ट्रेशन आयडी व पासवर्ड यांचा वापर करुन लॉग इन करावे. यशस्वीरित्या लॉग-इन झाल्यानंतर स्क्रिनवर डाव्या बाजूस उपलब्ध असणा-या मेन्यू मधील ईआर-१ या पर्यायावर क्लिक करावे, सदनंतर स्क्रिन वर दिसणा-या एन्टर या बटणावर क्लिक करुन आपल्या आस्थापनेची मनुष्यबळाबाबतची माहिती अद्यायावत करावी.
  •  माहिती भरुन (Submit) झाल्यानंतर जनरेट रिसीट या बटणावर विलक करून आऊनलोड करुन घ्यावे व आपल्या माहितीस्तव ईआर-१ भरल्याबाबतची रिसीट जतन करुन ठेवावी.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्कचौक, सोलापूर (०२१७-२९९२९५६) या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सोलापूर यांनी केले आहे .

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *