बीरमणी बीर, राजेश अजमिरे, अतीश लांबतुरे पुरस्काराने सन्मानित

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील तीन कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांचा संरक्षा पुरस्कार

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क||

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील बीरमणी बीर (डेप्युटी स्टेशन मॅनेजर, अक्कलकोट रोड, सोलापूर विभाग), राजेश अजमिरे (डेप्युटी स्टेशन मॅनेजर, ढोकी), अतीश लांबतुरे (पॉइंट्समन) या तीन कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांचा संरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीणा यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित एका कार्यक्रमात सोलापूर विभागातील ३ मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्काराने सन्मानित केले.
मागील महिन्यांत कर्तव्यादरम्यान स्थित राहून कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेबद्दल, अनुचित घटना टाळण्यात आणि रेल्वे ऑपरेशनमध्ये सुरक्षितता सुनिश्चित करण्यात त्यांच्या योगदानाबद्दल संरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले. पदक, प्रमाणपत्र, अनुकरणीय संरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्र आणि २ हजार रुपये  रोख बक्षीस असे पुरस्काराचे स्वरूप होते.

पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे:

१) बीरमणी बीर (डेप्युटी स्टेशन मॅनेजर, अक्कलकोट रोड, सोलापूर विभाग) यांना  दि. १७ जून २०२५ रोजी लूपलाईनजवळ एका मालगाडीशी सिग्नलची देवाणघेवाण करताना वॅगनमधून एक भाग लटकलेला दिसला. त्यांनी ताबडतोब धोक्याचा संकेत दाखवला आणि पुढील कारवाईसाठी ट्रेन थांबवली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि तत्काळ कारवाईमुळे संभाव्य दुर्घटना टळली. त्यामुळे त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


२) राजेश अजमिरे (डेप्युटी स्टेशन मॅनेजर, ढोकी, सोलापूर विभाग) यांना दि. १४ जून २०२५ रोजी मालगाडीशी सिग्नलची देवाणघेवाण करताना, दुसऱ्या शेवटच्या वॅगनचा एक भाग लटकलेला दिसला. त्यांनी ताबडतोब लोको पायलटला कळवले आणि पुढील कारवाईसाठी ट्रेन थांबवली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि तत्काळ कारवाईमुळे संभाव्य दुर्घटना टळली. त्यामुळे त्यांना सन्मानित केले.

३) अतीश लांबतुरे (पॉइंट्समन, सोलापूर विभाग) यांना  दि. ५ जून २०२५ रोजी मालगाडी येत असताना एका वॅगनचा पिस्टन रॉड सैल पडलेला दिसला. त्यांनी ताबडतोब संबंधित विभागाला माहिती दिली आणि त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळण्यास मदत झाली. त्यामुळे त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) डॉ. सुजीत मिश्रा यांनी पुरस्कार विजेत्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी चंद्र किशोर प्रसाद, इतर प्रमुख विभाग प्रमुख आणि मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *