जिल्हा पुरवठा अधिकारी यांची माहिती
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क||
सोलापूर : नवीन रास्तभाव दुकानाबाबत जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर यांनी दिली आहे.
शासनाचे धोरण दरवयों सध्याची रास्तभाव दुकाने/किरकोळ करोसीन परवाने तसेच ठेवून, आजमितीस रदद असलेली व यापुढे रदद होणारी, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन तसेच विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने मंजूर करण्यात यावीत.
सदरील शासन धोरणानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सोलापूर ग्रामीण मधील सर्व तहसीलदार यांना लेखी पत्र देऊन जाहीरनामा प्रसिध्द करण्याबाबतची विहीत नमुन्यातील माहिती मागविण्यात आलो होती. सदर प्राप्त माहितीच्या आधारे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांची नवीन जाहीरनामा प्रसिध्दीकरणास परवानगी घेऊन सोमवार, दि. ३० जून २०२५ रोजी खालील तालुक्यामधील गावांमध्ये नवीन दुकान मंजूरीसाठी जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आलेला आहे.
सदर जाहीरनामा पाहण्यासाठी सर्व तहसील कार्यालयाचे व जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाचे नोटीस बोर्डवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
तरी इच्छूक पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांनी विहीत नमुन्यात संबंधित तहसीलदार यांचे कार्यालय येथे दि. १ जुलै २०२६ पासून दि. ३१ जुलै २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत स्वतः सादर करावेत. सदरील अर्ज तहसीलस्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. त्याचे शुल्क घेऊन अर्ज संबधितास उपलब्ध होतील.
-
रास्तभाव धान्य दुकान जाहीरनामा सन २०२५ :
उत्तर सोलापूर : मौजे अकोलेकाटी (संख्या १)
बार्शी : मौजे इंदापूर, घोळवेवाडी, नांदणी, सर्जापूर, हिंगणी पा., दडशिंगे, चिखर्डे, सासुरे (एकूण संख्या ८)
दक्षिण सोलापूर : बिरनाळ, चिंचपूर (एकूण संख्या २)
अक्कलकोट : मौजे चपळगाव, मराठवाडी, किणी, कुमठे, परमानंद तांडा बबलाद (एकूण संख्या ५)
पंढरपूर : मौजे/टप्पा, तरटगांव, देगांव, पंढरपूर प्रभाग क्र. १७, फुलचिंचोली (एकूण संख्या ५)
मोहोळ : मौजे बेरागवाडी, पिरटाकळी, शेटफळ, चिंचोलीकाटी, भैरववाडी-मनगोळी ( एकूण संख्या ५)
माढा : मौजे तांबवे, रांझणी, खैरेवाडी, पिंपळनेर (एकूण संख्या ४)
करमाळा : मौजे पोटेगाव (एकूण संख्या १)
सांगोला : मौजे गावडेवाडी, घेरडी (एकूण संख्या २)
मंगळवेढा : मौजे सिध्दापूर. रहाटेबाडी, हिवरगाव, डोणज, खुपसंगी, मेटकरवाडी,महमदाबाद हू., मंगळवेढा, अवताडेवाडी (एकूण संख्या ९)
माळशिरस : मौजे सरगरवाडी ( एकूण संख्या १)
एकूण दुकाने : ४३
