विधीगंध चषक क्रिकेट स्पर्धा, वकिलांचे २५ संघ सहभागी

 विधीगंध स्मृती पुरस्कार वितरण सोहळा, तीन  ज्येष्ठ वकीलांचा  होणार सन्मान

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क||

सोलापूर : विधीगंध सेवा संस्था आणि सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही वकिलांसाठी विधीगंध टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे दि. १२  ते १४  एप्रिल २०२५  दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच आपल्या वकिली क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या तीन ज्येष्ठ वकिलांना पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी  माहिती विधीगंध सेवा संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष न्हावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूरच्या नेहरू नगर शासकीय मैदानावर दि. १२  एप्रिलपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दि. १४ एप्रिलपर्यत वकिलांच्या विधीगंध चषक स्पर्धा होणार आहेत.  त्यामध्ये एकूण वकिलांचे २५ संघ सहभागी होणार आहेत. दहा षटकांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. वकिलांमध्ये सांघिक भावना वाढावी या हेतूने  ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

                                                            अ‍ॅड. वसंतराव भादुले

 

वकील क्षेत्रात आपली उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ विधिज्ञांच्या नावाने तीन ज्येष्ठ वकीलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्व. भास्कर ऊर्फ तात्यासाहेब नेर्लेकर स्मृती विधीगंध पुरस्काराने अ‍ॅड. वसंतराव भगवान भादुले यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच  स्व. आण्णासाहेब ऊर्फ ए.तु.माने स्मृती पुरस्कार अ‍ॅड. दत्तात्रय नानासाहेब काळे यांना तर स्व. ए.डी.ठोकडे स्मृती विधीगंध पुरस्कार अ‍ॅड. पी.आर. बापुसाहेब करंजकर यांना देवून सन्मानित  करण्यात येणार आहे.

                                                                               अ‍ॅड. दत्तात्रय काळे

सोलापूरचे सुपुत्र  माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम शनिवार दि. १२  एप्रिल रोजी सकाळी १०  वाजता रंगभवन येथे होणार आहे. या पत्रकार परिषदेस  अ‍ॅड. जहीर सगरी, अ‍ॅड.शैलेश पोटफोडे, अ‍ॅड. सचिन साखरे, अ‍ॅड. योगेश कुरे आदी उपस्थित होते.

                                                                           अ‍ॅड. पी.आर. बापुसाहेब करंजकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *