“एमआय” ला झाले तरी काय? मैदानावर येण्यापूर्वीच कर्णधाराची पहिली चूक?

मुंबई  इंडियन्सच्या खेळाडूंचे परफॉर्मन्स  चिंताजनक?  हिटमॅनला फॉर्म कधी गवसणार?

एक नव्हे दोन नव्हे तर पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला अन त्यांच्या खेळाडूंना झाले तरी काय ? असा सवाल आमच्या क्रिकेट  चाहत्यांना नक्कीच पडणार? व्हय.. हा प्रश्न नक्कीच मनात उपस्थित झालाय. आता याचे उत्तर तर शोधावे लागणार. पाच वेळा चॅम्पियन  राहिलेला मुंबई इंडियन्स हाच संघ आहे का? याच कुणी क्रिकेट समीक्षक देईल का? खरंच मुंबई  इंडियन्सच्या संघात प्रॉब्लेम  आहे का? यावर सोल्यूशन  काय? संघ व्यवस्थापन यावर काय तोगडा काढेल? हिटमॅनला फॉर्म कधी गवसणार? अशी अनेक प्रश्नांची उत्तरे सध्यातरी निरुत्तरीत आहेत.

image source

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सन २०२५ च्या सत्रातील आयपीएलचा नववा सामना झाला.  या सामन्यात कर्णधार राहिलेल्या हार्दिक पांड्याची पहिली चूक झाली असेच म्हणावे लागेल. नाणेफेक जिंकूनही प्रथम  क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.  त्यामुळे मैदानावर येण्यापूर्वीच कर्णधाराची पहिली चूक झाली? असेच म्हणावे लागेल. सध्या हिटमॅन फॉर्मात  नाही. सलामीला येऊनची तो सपशेल फेल ठरला. पहिल्याच शतकात त्याला मोहम्मद सिराजने अवघ्या ८ धावांत त्रिफळाचीत केले. रोहित शर्मासारखा अनुभवी फलंदाज जर सलामीला येऊन  अशा पद्धतीने खेळून विकेट देत असेल तर संघातील अन्य खेळाडूंवर नक्कीच मानसिक दबाव येणार? तसेच झाले. रायन रिकेलटन हादेखील रोहित शर्माच्या पाठोपाठ अवघ्या ६ धावांवर तंबूत परतला. वास्तविकतेत गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची सुरूवातीपासूनच अचूक मारा केला. गुजरातच्या खेळाडूंनी अनुशासनात्मक खेळीचे दर्शन घडवून आणले.

image source

मुंबई इंडियन्सचे खेळाडू जरी खेळले असले तरी त्यांच्यातील अतिआत्मविश्वास नडला. अहमदाबादची खेळपट्टी प्रथम फलंदाजीसाठी पोषक नव्हते. मग मुंबई  इंडियन्सचा  कर्णधार हार्दिक पांड्याने प्रथम क्षेत्ररक्षण का स्वीकारले? जर हा त्यांचा  गेम  प्लॅनचा एक भाग होता तर मग गुजरात टायटन्सला दिडशेच्या आसपास रोखायला हवे होते. तसे झाले नाही. गुजरात टायटन्सने २० शतकात १९६ धावा कुटल्या. १९७ धावांचे आव्हान मुंबई इंडियन्सला न पेलवणारे असे ठरले. मुंबई इंडियन्सचे खेळाडू खेळायचे म्हणून खेळत राहिले. आपला संघ हरणार, असे गृहीत धरूनच ते खेळत राहिले. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव हे सेट झालेले फलंदाज होते. त्यांना खेळपट्टीवर  थांबणे, टिकून खेळणे अनिर्वाऱ्य असताना त्यांनी विकेट गमावल्या. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्यादेखील काही कमाल करू शकला नाही. तो आपला संघ अडचणीत असताना धीर आणि धैर्य गमावून बसला. खेळावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तो सामन्यादरम्यान साई किशोरशी भिडला. येथेच त्याच्यावर मानसिक दबाव आला. रनरेट वाढत चालल्याचा दबाव तो फार वेळ पेलवू शकला नाही. संयम सुटला आणि तोही बाद झाला. त्यानंतर नमन धीर आणि मिचेल जोसेफ सँटनर यांनी शेवटच्या क्षणी  फटकेबाजी केली. पण वेळ निघून गेला होता. रनरेट त्यांना आवरता नव्हता. त्यामुळे अखेर मुंबई इंडियन्सने २० शतकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १६० धावा काढल्या. त्यांना गुजरात टायटन्सने ३६ धावांनी पराभूत केले. गुजरातच्या वरच्या या ३० ते ४० धावा मुंबईला महागात पडले.

image source

मुंबई इन्डियन्सच्या संघातील व्यवस्थापनात कोठे तरी गडबड आहे. सलामीची जोडी सपशेल फेल ठरत आहे. यावर त्यांनी विचारच केलेल नाही. संघात को-ऑर्डिनेशनची कमतरता आहे. गत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यात आपल्या आयपीएलच्या पदर्पणातच तीन बळी घेऊन सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याला गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात का घेतले गेले नाही? हार्दिक पंड्या हा मुंबई  इन्डियन्सचा कर्णधार म्हणून कितपत यशस्वी ठरत  आहे.

मुंबई इन्डियन्सचा संघ रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या केवळ तीनच खेळाडूंवर निर्भर करते आहे. यांना कोणताही सामना असो , खेळावेच लागणार आहे. हे फेल गेले की मुंबई इन्डियन्सचे पतन अन्य कोणताही खेळाडू रोखू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. गोलंदाजीत जसप्रीत  बूमराह हा जितका मुंबई इन्डियन्ससाठी सातत्याने प्रभावशील ठरत आहे तितका अन्य कोणताही खेळाडू ठरत नाही. दुर्दैव  म्हणजे बूमराह देखील सध्या खेळत नाही.

image source

मुंबईसाठी कोणताही विदेशी खेळाडू गोलंदाजी, फलंदाजीमध्ये आतापर्यंत  तरी प्रभावशाली ठरू शकलेला नाही. अर्थात मुंबई इंडियन्स संघामध्ये जरी रथी-महारथी आणि दमदार  खेळाडू असले तरी त्यांचा दमदारपणा कोणत्याही सामन्यात कोणत्याही खेळाडू कडून दिसत नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघ  व्यवस्थापनाला या संघातील सर्व उणे बाजू तपासून पाहणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *