दूरसंचार अधिकार आणि विशेषाधिकारविषयी ग्राहक जागरूकता कार्यशाळा  

विविध शाखेतील विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचाही सहभाग 

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क||

सोलापूर  : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) आणि वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (WIT) यांच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड कॉम्प्युटर इंजिनियरिंग शाखेतील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी ग्राहक जागरूकता अभियान कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.

या अभियानात ‘दूरसंचार अधिकार आणि विशेषाधिकार’ या विषयावर प्रादेशिक प्रमुख आणि सल्लागार, TRAI प्रादेशिक कार्यालय, बंगळुरूचे ब्रजेंद्र कुमार यांनी मार्गदर्शन केले. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना ग्राहकांचे मूलभूत हक्क, विशेषाधिकार, सेवा वापरताना घ्यावयाची काळजी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबद्दल त्यांनी विस्तृत माहिती दिली. ग्राहकांनी दूरसंचार सेवा अधिक प्रभावीपणे कशा वापराव्यात आणि त्यांच्या अभिप्रायाच्या आधारे सेवा सुधारण्यासाठी कोणत्या सूचना देता येतील, याविषयीदेखील चर्चा झाली.

दुसऱ्या सत्रात सायबर क्राईम ग्रामीण पोलीस स्टेशन, सोलापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित पवार यांनी ‘सायबर सुरक्षा, सायबर गुन्हे आणि आर्थिक साक्षरता’ यावर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्याच्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली.पाहुण्यांचे स्वागत इलेक्ट्रॉनिक अँड कॉम्प्युटर इंजिनियरिंग विभाग प्रमुख डॉ. सचिन गेंगजे यांनी केले. प्रास्ताविक वरिष्ठ संशोधन अधिकारी, TRAI प्रादेशिक कार्यालय, बंगळुरूचे  के. मुरलीधर यांनी केले.

या कार्यक्रमाला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभाग प्रमुख डॉ. आशा थळंगे, प्राध्यापक, सोलापुरातील विविध टेलिकॉम सेवा प्रदात्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. रोहिणी मेरगू, अमेय सांगोळे आणि रिया फरसुले यांनी केले.   आभार प्रदर्शन समन्वयक प्रा. श्रीशैल स्वामी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *