“रन फॉर लेप्रसी”च्या माध्यमातून कुष्ठरोग विषयी जनजागृती करावी : मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क||
सोलापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम जनजागृती अंतर्गत कुष्ठरोग दौड “रन फॉर लेप्रसी” मॅराथॉन स्पर्धेत सुमित जावीर, चैताली माने अव्वल धावपटू ठरले. या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी गुरुनानक चौक येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हिरवा झेंडा दाखवून केला.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, सहा. संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, डॉ. आनंद गोडसे, डॉ. सुनंदा राऊराव डॉ. अभिवंत, जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात, एनसीसी बटालीयनचे रणधीर सतिप, सरब बाबर, तानाजी चव्हाण, विक्रमजित सिंग, जिल्हा अॅथलेटिक्स संघाचे सेक्रेटरी प्रा. राजू प्याटी, एनसीसी बटालीयनचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही मॅराथॉन होटगी नाका, अंत्रोळीकर नगर, कुमठा नाका मार्गे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आली. या जनजागृती मॅरेथॉनमध्ये ४३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या मॅराथॉनमध्ये एनसीसी बटालियन संगमेश्वर, वालचंद, हरिभाई देवकरण कॉलेज, समर्थ अॅकॅडमीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या मॅरेथॉनमध्ये सहभागी विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या माध्यमातून कुष्ठरोग विषयक मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. सोलापूर जिल्हा व संपूर्ण भारत देश कुष्ठरोग मुक्त होण्याच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी आवाहन केले.
विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे-
- पुरुष गट : १) सुमित अविनाश जावीर २) अनिल चव्हाण ३) तेजस नारायण शिंदे.
- स्त्री गट : १) चैताली गणेश माने २) अद्विका देशमुख ३) अनामिका विठ्ठल राठोड.
- उत्तेजनार्थ पुरुष गट : कुंदन अंबादास राठोड, सुभेदार गळवे. स्त्री गट: नम्रता शांतमल्लप्पा धोत्रे.
रन फॉर लेप्रोसी ही मॅराथॉन जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, आयुक्त महानगर पालिका डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. विजेत्यांना रोख बक्षीस, प्रमाणपत्र व मानचिन्ह डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. मोहन शेगर, सहा संचालक (कुष्ठरोग) सोलापूर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
यावेळी डॉ. संतोष नवले यांनी सन २०२७ पर्यत कुष्ठरोगाचा शून्य संसर्ग करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती आवश्यक असल्याचे सांगितले. असे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन जनसामान्यात कुष्ठरोगाविषयी असलेल्या अंधः विश्वास व गैरसमजुतीवर मात करावी. कुष्ठरोगाचे संशयीत लक्षणे असलेल्या व्यक्तीस जवळच्या शासकीय दवाखान्यात मोफत निदान व कुष्ठरोगाच्या उपचारासाठी पाठवून देण्यात यावे. महात्मा गांधीजी यांचे कुष्ठरोग मुक्त भारताचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे अवाहन केले.
सहा. संचालक (कुष्ठरोग) डॉ. शेगर यांनी कुष्ठरोगाच्या बाबतीत असलेली भिती, चुकीच्या संकल्पना यांना बळी न पडता लवकर निदान व योग्य व पुरेसा उपचार घेतल्याने कुष्ठरोग १०० टक्के बरा होऊन कुष्ठरुग्णास येणारी विकृती टाळता येते. कुष्ठरोगाचा होणारा संसर्गाची साखळी खंडीत करुन कुष्ठरोगाचा शुन्य संसर्ग हे उष्ठि सर्वांच्या सहकार्याने साध्य करणे शक्य होईल. याकरिता कुष्ठरोगचे संशयीत लक्षण असणाऱ्या व्यक्तीने न घाबरता जवळच्या दवाखान्या निदान करुन उपचार घ्यावा, असे अवाहन केले.
ही जनजागृतीत्मक मॅराथॉन स्पर्धा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, डॉ. राखी माने, मुख्य आरोग्य अधिकारी, मनपा, डॉ. सहा. संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर यांचे मार्गदर्शनाखाली वैध्यकिय अधिकारी, डीएनटी डॉ. आनंद गोडसे, वैद्यकीय अधिकारी, पनाकुप डॉ. सुनंदा राऊतराव डॉ. अरुंधती हराळकर, शहर क्षयरोग अधिकारी, डॉ. शिवलीला कांते, डॉ. खडतरे वैद्यकीय अधिकारी व सहायक संचालक (कुष्ठरोग) कार्यालयातील व कुष्ठरोग विभागातील सर्व कर्मचारी यांनी पार पाडली. या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले सर्वांचे आभार डॉ. आनंद गोडसे यांनी मानले.