तत्काळ या तक्रारींचा निपटारा करावा; निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आजच्या लोकशाही दिनात जिल्ह्यातील २२ शासकीय कार्यालयात ३२ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारी संबंधित कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत असून, तत्काळ या तक्रारींचा निपटारा करावा. तक्रार करण्यासाठी येत असलेल्या नागरिकांशी सर्व संबंधित कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी चांगली वर्तणूक ठेवावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिले आहेत.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात येतो. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, कौशल्य विकास कार्यालयाच्या सहाय्यक संचालक संगिता खंदारे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा कारागृह अधीक्षक सुशील कुंभार, तहसीलदार श्रीकांत पाटील, आरोग्य विभागाचे डॉ. विजय वरवटकर, यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

लोकशाही दिनात संबंधित शासकीय कार्यालयाकडे आलेल्या तक्रारी पुढील प्रमाणे:-
जिल्हा परिषद सोलापूर- ५ , पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण – २, पोलीस आयुक्त सोलापूर शहर- १, जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख कार्यालय सोलापूर- १, कामगार आयुक्त- १, सार्वजनिक बांधकाम विभाग- १, महसूल शाखा- २, तहसिलदार बार्शी-१, तहसिलदार उत्तर सोलापूर- १, महावितरण सोलापूर-३, प्रबंधक जिल्हा अग्रणी बँग सोलापूर-१, भुसंपादन शाखा- १, उपविभागीय अधिकारी पंढरपूर- २, तहसिलदार माळशिरस- १, उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रं.२- १, भविष्य निर्वाह निधी कार्यालय, सोलापूर- २, तहसिलदार पंढरपूर-१, प्रबंधक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोलापूर-१, जिल्हा उपनिबंधक सह संस्था सोलापूर-१, प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर विभाग, सोलापूर- १, तहसिलदार महसूल- १, दुय्यम निबंधक सोलापूर-१ अशा एकूण ३२ तक्रारी अर्ज जिल्हा लोकशाही दिनामध्ये प्राप्त झालेल्या आहेत.
